Homeकोपरगावशब्दगंध साहित्यिक परिषदेने नेहमीच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले - मंगल हेमचंद्र...

शब्दगंध साहित्यिक परिषदेने नेहमीच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले – मंगल हेमचंद्र भवर

कोपरगाव – शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने नेहमीच नवोदितांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे असे विचार चंद्रमा कलर फोटोच्या जेष्ठ संचालिका मंगल हेमचंद्र भवर यांनी बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना सांगितले.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कोपरगाव शहराच्या सीमेवर असलेल्या जेऊर पाटोदा येथील चंद्रलिला नगर भागातील रेणुका माता मंदिराच्या परिसरात बालसंस्कार केंद्राच्या वतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संस्कार केंद्राच्या सोनाली नागरे वर्षा कोकाटे वैष्णवी दवंगे यांनी मार्गदर्शन केले रांगोळी रेखाटन करताना विद्यार्थ्यांनी अनेकविध विषयांवर रेखाटन केले. रांगोळी स्पर्धेत झाडे जगवा झाडे वाचवा, रंगांच्या साड्या, आणि इतर काही विषयांवर रांगोळी काढली गेली.

प्रथम क्रमांक अंकिता संतोष जाधव, द्वितीय स्वरा कोकाटे, तृतीय वैभवी संजय खताळे, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र व चंद्रमा कलर फोटोच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी गोष्टींची पुस्तके देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुनिता सुनील भाबड, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती काळे, शोभा दिघे ज्योती करंजे गौरी आकाश भाबड हेमचंद्र भवर सुनील चंद्रभान भाबड आदी मान्यवर उपस्थित होते सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!