
कोपरगावः- आंतर विभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पैलवान राहूल पादमोर याने फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अखिल भारतीय विद्यापिठ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील पैलवानांनी त्याच्या या यशाचा आनंद साजरा केला. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व विश्वस्त मंडळाने त्याचे अभिनंदन केले.

जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या वतीने धुळे येथे हि आंतर विभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सुरवातीच्या लढतीपासूनच पादमोर यांना आपले वर्चस्व कायम ठेवले. आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक भरत नायकल यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. आता अखिल भारतीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत तो कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनीधीत्व करणार आहे. त्याच्या या यशा बद्दल बोलताना सुर्यवंशी म्हणाले, पैलवान राहूल याने आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा नावलौकीक वाढवीला आहे. या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण दिले जाते. साई ची मान्यता प्राप्त केंद्र आहे. त्यामुळे येथील पैलवान विविध कुस्ती स्पर्धात सातत्याने उत्तम कामगीरी करतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक भरत नायकल व पै. विवेक नायकल, NIS कुस्ती कोच पै.अशोक पाटील, NIS कुस्ती कोच पै. अक्षय डांगे यांचे या कुस्ती केंद्राला मार्गदर्शन लाभले.