
कोपरगांव :- तालुक्यातील आपेगांव येथील श्रीमती झेलुबाई कारभारी पाटोळे (१००) यांचे निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोपरगांव बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांच्या त्या मातोश्री होत्या. धार्मिक, मनमिळाऊ स्वभावाने त्या सर्व परिचित होत्या. त्यांच्या पार्थीवावर आपेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले.

याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, केशव भवर आदिंनी शोक व्यक्त केला.