
कोपरगाव :- सौ वंदना जगमोहन चिकटे यांना माऊली नवदुर्गा पुरस्कार तसेच सौ ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई कोपरगाव यांना साहित्यिक क्षेत्रातील साहित्यकला अकादमी पुरस्कार प्रदान

शिर्डी येथे माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात कोपरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सौ. वंदना जगमोहन चिकटे यांना त्यांच्या कला, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, लघुउद्योजिका, अशा विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल माऊली नवदुर्गा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.
तसेच शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ. ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई , यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल माऊली साहित्य कला अकादमी पुरस्कार 2026

मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, डॉ. सौ मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते हा गौरव झाला.
याप्रसंगी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री सुरेश मुळे, कार्याध्यक्षा सौ. सरलाताई शेष, सचिव प्रा. ज्ञानेश्वरी मुळे मा. सतीश वैजापूरकर श्री मकरंद कोऱ्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र ऊदागे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, राजेंद्र कोयटे, प्राचार्य डॉ. एड हिरालाल महानुभाव प्रा. संतोष तांदळे, साहित्यिक हेमचंद्र भवर आदींनी शुभेच्छा दिल्या.