Homeकोपरगावश्रावण मासा निमित्ताने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

श्रावण मासा निमित्ताने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

कोपरगाव – येथील शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखा व चंद्रमा कलर फोटोच्या वतीने श्रावण मासा निमित्ताने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्षमी सातभाई व हेमचंद्र भवर यांनी दिली आहे.

काव्यलेखन स्पर्धेसाठी महिलांचे सण माहेर व निसर्ग संवर्धन या दोन विषय असून स्पर्धा शालेय गट व खुल्या गटात होणार असून आपल्या किमान दोन कविता स्व लिखित असल्याचे प्रमाणपत्रासह चंद्रमा कलर फोटो, बंब प्लाझा विष्णू थिएटर जवळ गोदाम गल्ली स्टेट बँकेच्या समोर, कोपरगाव येथे दिनांक अकरा आॅगसट पर्यंत पाठविण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेचा अंतिम निर्णय समितीने राखून ठेवला असून यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!