
कोपरगाव : – केंद्रीयमंत्री मा. श्री. अमितजी शहा यांच्या नवीन सहकार धोरणानुसार प्रत्येक सहकारी संस्थांना पंचक्रोशितील कुठलेही गाव दत्तक घेऊन तेथील नागरिकांना अवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसह पर्यटन स्थळांचा विकास करण्यात यावा अशी सूचना दिलेली असून, मा. श्री. अमितजी शहा यांच्या सूचनेचा आपण आदर करून राघवेश्वर सहकारी पतसंस्था कुंभारी आणि समता सहकारी पतसंस्था कोपरगाव या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून कुंभारी हे गाव दत्तक घेऊन ग्राम दत्तक योजने अंतर्गत गावचा सर्वांगिण विकास करू असे मत समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे यांनी नुकतेच अक्षय तृतीयेचे दिवशी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ९२१ व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे वीरशैव लिंगायत समाज स्मृतीस्थळ व महात्मा बसवेश्वर स्तंभ आणि उद्यानाचे फलक अनावरण प्रसंगी रविवार १९ एप्रिल २०२६ रोजी बोलतांना सांगितले.

प्रारंभी समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक व कार्यक्रमाचे अध्यक्ष, लिंगायत समाज भूषण मा. श्री. काकासाहेब कोयटे, सौ. सुवासिनी कोयटे तसेच राघवेश्वर देवस्थान कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करुन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर उद्यान फलकाचे अनावरण करतं वृक्ष रोपन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पुढे बोलतांना श्री.काकासाहेब कोयटे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माननिय आशुतोषदादा काळे यांच्याशी दुरध्वनी मार्फत ग्राम दत्तक योजनेस आमदार निधी किंवा इतर निधी मिळणे संदर्भात माझी सखोल चर्चा झाली असून, यासंदर्भात त्यांनी आपल्याला ग्राम दत्तक योजनेस ग्रामविकास निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली. तद्पूर्वी ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदरप्रसंगी आश्रमाचे मठाधिपती राघवेश्वरनंदगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, देवाधिदेव महादेव राघवेश्वराच्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये उत्तर दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कुंभारी नगरवासियांचे भाग्य थोर आहे की, राघवेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र विकासात ग्रामदत्तक योजने अंतर्गत राघवेश्वर सहकारी पतसंस्था कुंभारी आणि समता सहकारी पतसंस्था कोपरगाव यांच्या माध्यमातून परिसर विकासात महात्मा बसवेश्वर महाराज उद्यानाची मोलाची भर पडणार असल्याने त्यांनी दोन्ही संस्थांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि श्री. व सौ. कोयटे यांचा व आदि मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी समता सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्षा सौ. सुवासिनी कोयटे, ग्रामपंचायत प्रथम महिला सरपंच सौ. देवयानी घुले, कुंभारी राघवेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. गोपीनाथभाऊ निळकंठ, माजी सरपंच व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. श्री. प्रशांतजी घुले यांसह विविध संस्थांचे आजी – माजी चेअरमन, संचालक तसेच लिंगायत समाज बांधव – भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मा. श्री. गोपीनाथभाऊ निळकंठ यांनी मानले.