Homeकोपरगावआत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

एन.एम.एम.एस परीक्षेत 92 विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

कोपरगाव:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करत राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान प्राप्त केले. या शाळेने अकराव्या वेळेस अशी अव्वल कामगिरी केली आहे. यंदा या शाळेचे 92 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.

त्यांना प्रत्येकी दरमहा 1000 रुपये प्रमाणे चार वर्षासाठी 48000 रूपयांप्रमाणे एकूण 44 लाख 16 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती गुरूकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, या वर्षी सदर परीक्षेचे मिरिट हे आजपर्यंतचे सर्वोच्च असतांनाही आत्मा मालिकेची कामगिरी लक्षवेधी ठरली. या परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाचे आजपर्यंत 1772 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून त्यांनी 8 कोटी 50 लाख 56 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!