Homeकोपरगावमहाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित कनिष्ठ गट राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा डंका.

महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित कनिष्ठ गट राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा डंका.

कोपरगाव :- शालेय जीवनात विद्यार्थी आपापल्या आवडी निवडी नुसार क्रिडाक्षेत्रात अनेकविध असणाऱ्या खेळ प्रकारांपैकी एखादा तरी खेळ अंगिकृत करतो, त्यामधून स्वतःची प्रकृती सुधारतो, समाजासह गावाची शान वाढवून शाळेचा गौरव आणि जिल्ह्याचा अभिमान वाढविण्याची ताकद त्याच्या सुप्त गुणामध्ये असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

डेरवन (रत्नागिरी) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित कनिष्ठ गट राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंनी सुवर्णपदक: २, रौप्यपदक: २, कांस्यपदक: ३ मिळवून घवघवीत यश संपादन केले.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद (Overall Championship) मिळवून अहिल्यानगरच्या खेळाडूंनी जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे अहिल्यानगर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्याच्यावतीने मनापासून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यामध्ये दिव्यांगी लांडे हिने २०० मीटर धावणे सुवर्णपदक तर १०० मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक मिळविले,

वैभव कवठेकर याने १०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक मिळविले,

कु. पायल गवळी हिने गोळाफेक प्रकारत रौप्यपदक मिळविले,

साई लोखंडे याने भालाफेक प्रकारात कांस्यपदक मिळविले,

सिद्धी रासकर हिने थाळीफेक प्रकारात कांस्यपदक मिळविले

तर वेदिका वाणी हिने किड जॅव्हलिन (भालाफेक) प्रकारत कांस्यपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामागे मा. संदीप घावटे, मा. श्रीरामसेतु आवारी, मा. सौरभ वरखडे, मा. अजित पवार आणि मा. सुजित बाबर या सर्व संघव्यवस्थापकांचे व मार्गदर्शकांचे मोलाचे नियोजन आणि प्रोत्साहन राहिले आहे.

सर्व विजेत्या खेळाडूं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या व्यवस्थापक व प्रशिक्षक टीम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!