Homeकोपरगावमुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत: नंदीवाले तिरमली जातपंचायतचा अजब फतवा

मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय जातीतून बहिष्कृत: नंदीवाले तिरमली जातपंचायतचा अजब फतवा

कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील नंदीवाले तिरमली जात पंचायतीने एका कुटुंबाला जातीमधून बहिष्कृत केले आहे.
पीडित कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीच्या मुलीने जातीतच प्रेमविवाह केला. सदर घटना ही जातीच्या नियमाविरुद्ध असल्याचे सांगत पन्नास हजार रुपये दंड वसूल केला व सदर कुटुंबाला वाळीत टाकले.

भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या मुलीने जातीतील सज्ञान मुलीने तिच्या जातीतीतलच एका मुलासोबाबत विवाह केला परंतु त्यांच्या जातपंचांनी तो विवाह अमान्य केला. धामोरी येथे जातपंचायत भरवून पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. पीडित कुटुंब हे अत्यंत गरिब आहे. सुया – फण्या विकून पालामध्ये राहत कशीबशी उपजीविका करत आहे. तरीही त्यांनी पन्नास हजार रुपये कर्ज जातपंचायतीला दिले. उरलेली रक्कम पीडित कुटुंब देऊ शकले नाही. त्यामुळे जातपंचांनी पीडितांच्या संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केली. त्यांच्याशी कुणीही बोलण्याचे नाही. सुख- दुःखाच्या प्रसंगात बोलवायचे नाही अन्यथा त्यांनाही दंड करून जाती बाहेर काढू असा फतवा काढला. त्यांच्या मुलीला पण भेटून दिले जात नाही. कुटुंबाला जात पंचायतीकडून दिला जाणारा जाच, छळ कमी झाला नाही.

जातपंचायतीच्या अन्यायकारक न्यायनिवाड्यामुळे स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीला सुद्धा आनंदा अहिरे यांना उपस्थित राहता आले नाही. अशा प्रकारची अनेक धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये अहिरे कुटुंबाला बंधनं घातली गेली, पीडितांनी ही तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडितांना घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. सामाजिक बहिष्कार विरोधी बहिष्कार विरोधी कायद्यान्वये जातपंचावर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिले . त्याप्रमाणे तक्रार दाखल झाली आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क:
कृष्णा चांदगुडे मो-9822630378
डॉ अशोक गावित्रे मो- 7972677781

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!