Homeकोपरगावमहाराष्ट्रभर वीरशैव लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी काका कोयटे यांच्या नेतृत्वाला साथ...

महाराष्ट्रभर वीरशैव लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी काका कोयटे यांच्या नेतृत्वाला साथ देणार – शशिकांत गुळवे व शिवलिंग डोंगरे यांची घोषणा

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जाहीर

कोपरगाव : महाराष्ट्रात सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाचे संघटन अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील उद्योजक, व्यावसायिक तसेच कार्यकर्त्यांना संघटित करून समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र तथा कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे विद्यमान संचालक आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष शशिकांत गुळवे यांची निवड करण्यात आली. तसेच लिंगायत संघर्ष समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर शिवलिंग आप्पा डोंगरे यांची निवड करण्यात आली. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी कर सल्लागार दत्तात्रय लोखंडे यांची निवड झाल्याची घोषणा वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष तथा लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली.

यावेळी बोलताना शशिकांत गुळवे म्हणाले, “कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीच्या सेवेतून आता मी मुक्त झालो असून, संचालक म्हणून माझी निवड झाली आहे. त्यामुळे समाजकार्यासाठी अधिक वेळ देता येणार आहे. काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर दौरे करून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या माध्यमातून विविध उद्योजक व व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी काम करणार आहे. तसेच डिसेंबरअखेरपर्यंत १०० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पतसंस्थांच्या माध्यमातून आणि लिंगायत संघर्ष समितीचे भगवान कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार आहे.”

शिवलिंग डोंगरे म्हणाले, “लिंगायत संघर्ष समितीचे काम अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक व्यापक करण्यासाठी लवकरच संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करण्यात येणार आहे. तालुकानिहाय तसेच जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. समाजातील सर्व वीरशैव लिंगायत कार्यकर्त्यांनी या कार्यात साथ द्यावी.”

या निवडीबद्दल लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा विश्वेश्वर सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुनील शेट रुकारी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. समितीचे राज्य उपाध्यक्ष संदीप झारेकर तसेच नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी दंदणे यांनीही निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या युवक आघाडीचे अध्यक्ष प्रदीप साखरे, माजी अध्यक्ष गोपीनाथप्पा निळकंठ, संतोष जिरेसाळ, अहिल्यानगरचे प्रकाशशेठ हापसे, नाशिक जिल्हा लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुचित गोंधळे, कार्याध्यक्ष आनंद दंदणे, नाशिक जिल्हा युवाध्यक्ष दुर्गेश दंदणे यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!