Homeकोपरगावशिर्डी येथे 'बी द चेंज फाउंडेशन' आयोजित सविता केदारे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने...

शिर्डी येथे ‘बी द चेंज फाउंडेशन’ आयोजित सविता केदारे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान सोहळा संपन्न.

कोपरगाव :-‘बी द चेंज फाउंडेशन (Be The Change Foundation) आयोजित ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६’ हा कार्यक्रम रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पाळे खुर्द ता. कळवण, जि. नाशिक येथील इंजि. सविता सावित्रीबाई निंबाजी केदारे यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

सदर पुरस्कार प्रमुख पाहुणे प्रभात डेअरी लि. व किसान कनेक्ट सेफ फूड प्रा. लि. संस्थापक संचालक मा. किशोर रामचंद्र निर्मळ, अश्वमेध ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, श्री. बाळकृष्ण खडे, मंडळ कृषी अधिकारी मा. तेजस्वी यमाजी मोटे, सद्गुुरू ग्रपुचे अध्यक्ष मा. सर्जेराव मुंढे, मा. बाबासाहेब कापे, मा. विशाल थोरात, मा. अरुण उत्तमराव भांडारे, मा. दादासाहेब ढोकचौळे आणि मा. अमृत रोहोम आदी मान्यवरांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास ‘बी द चेंज फाउंडेशन’ चे अध्यक्ष मयूर ढोकचौळे व सचिव सौ. रचना ढोकचौळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधुन आलेल्या मान्यवर, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

इंजि.सविता सावित्रीबाईं निंबाजी केदारे यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!