Homeकोपरगावआत्मा मालिक कुस्ती केंद्राची शालेय ज्युडो स्पर्धेत विक्रमी कामगीरी.

आत्मा मालिक कुस्ती केंद्राची शालेय ज्युडो स्पर्धेत विक्रमी कामगीरी.

कोपरगाव :- जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची लयलुट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांनी तब्बल तेरा सुवर्ण व चौदा रौप्य पदकांची कमाई करीत विक्रमी कामगीरी केली. नेवासे येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान मध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा व युवक संचलनालय व जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सुवर्णपदक विजेत्यांची येत्या चार आॅक्टोबर रोजी सोलापूर येथे होणार्‍या पुणे विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली. या यशामुळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या कुस्ती क्षेत्रातील भक्कम वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या आशिर्वाद या विद्यार्थ्यांना लाभले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक व भरत नायकल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विवेक नायकल, प्रशिक्षक राजू पाटील आणि अक्षय डांगे यांचे या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!