Homeकोपरगावआत्मा मालिक कुस्ती केंद्राचे पैलवान साई खेतमाळीस आणि पैलवान तुषार रणसिंग रौप्यपदकाचे...

आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे पैलवान साई खेतमाळीस आणि पैलवान तुषार रणसिंग रौप्यपदकाचे मानकरी

कोपरगाव – पंढरपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे पैलवान साई खेतमाळीस आणि पैलवान तुषार रणसिंग यांनी रौप्यपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील मल्ल साई खेतमाळीस याने ६० किलो वजनगटात तर मल्ल तुषार रणसिंग याने ६५ किलो याने ग्रिको रोमन प्रकारात प्रेक्षणीय खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली.

सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या छत्र – छायेखाली आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे पैलवान सातत्याने चांगली कामगीरी करीत असतात. वस्ताद भरत नायकल,आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विवेक नायकल, एनआयएसचे प्रशिक्षक राजू पाटील आणि अक्षय डांगे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!