
कोपरगाव – पारंपारीक सण उत्सव साजरा करणे ही महाराष्ट्रातील जनतेसाठी निसर्गाने दिलेला अनमोल असा ठेवा आहे आणि त्याची जपणूक करणे, प्रत्येक सणाचा भक्ती भावाने व एकोप्याने आनंद साजरा करणे हिच खरी त्यामागील श्रद्धा ठरते. असाच एक कोपरगाव शहरानजीक असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील चंद्रलिला नगर येथील रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवू दिवस देवीच्या पाठाचे आयोजन करण्यात आले तसेच दररोज संध्याकाळी होणाऱ्या आरती नंतर सामुदायिकपणे साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, राजगिरा लाडू, केळी वाटप करण्यात येते.

प्रसाद वाटपासाठी चंद्रलिला नगर भागातील व परिसरातील भाविक भक्तांनी सर्वतोपरी योगदान दिले. मंदिर परिसरात रोज संध्याकाळी आरती नंतर महिलांनी जोगवा फुगडी खेळून नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जात आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रलिला नगर क्विनच्या शोभा दिघे, सुनंदा देवरे, ज्योती करंजे, सुनिता भाबड, मंगल भवर आणि परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.