
कोपरगांव :- सध्या उसतोडणीचा हंगाम सुरू आहे, त्यासाठी मोठया प्रमाणांत स्थलांतरीत उसतोडणी कामगार जिल्हयातील साखर कारखान्यांच्या थळावर दाखल झाले असुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती.पी. एस. वाजेताई यांनी सोमवारी भेट देवुन या मुलांच्या शाळेसाठी जागेची पाहणी केली.

प्रारंभी शेतकी अधिकारी श्री. नारायण चौधरी प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे थळांवर दाखल होणा-या उसतोडणी कामगारांच्या प्रत्येक अडी अडचणींत मार्ग काढुन आवश्यक ते सहकार्य करतात तर स्थलांतरीत उसतोडणी कामगारांच्या मुलांना शाळेची गोडी लागावी, त्यांच्या प्राथमिक शिक्षणांत खंड पडु नये म्हणून त्यांना थळावरच शालेय साहित्य मोफत पुरवून त्यासाठीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात., गटशिक्षणाधिकारी पी. एस. वाजेताई यांनी कोल्हे कारखाना स्थळावर दाखल झालेल्या उसतोडणी कामगारांच्या लहान मुलांची माहिती घेवुन त्यांच्यासाठी थळातच शाळा सुरू करण्यासाठी जागेची पाहणी करून प्रशासन व कारखाना यंत्रणेस आवश्यक त्या सुचना केल्या. प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूरची पाहणी करून शिक्षकांची बैठक घेत त्यात स्थलांतरित मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनस्तरावर कोणत्या उपाययोजना आहेत याबाबतची माहिती देऊन ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी कशा पद्धतीने शाळा सुरू करायची याचेही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख सर्वश्री. रावसाहेब लांडे सर, लक्ष्मण पंडोरे सर, शरद आहेर सर, अशिष पारडे सर, वर्षा आगळेताई, अजित मुनतोंडे सर, राजेंद्र पाखरे सर, कांतीलाल गुरसळ सर, अमित रणधिर सर, सचिन म्हस्के सर, विवेक सोनवणे सर, सुवर्णा मगर ताई आदि उपस्थित होते. शेवटी उपशेतकी अधिकारी चंद्रकांत वल्टे यांनी आभार मानले.