
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेवर आत्मा मालिक गुरुकुलचे वर्चस्व
३२ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
कोपरगाव :- जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत कोकमठाण येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत आपले वर्चस्व सिध्द केले. या खेळाडूंनी विविध मैदानी क्रीडा प्रकारात पहिले तिन क्रमांक पटकावत आपल्या क्रीडानैपुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गुरूकुलातील २४ मुले व ८ मुलींची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने लोणी येथील विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर या क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. १९ वर्षांखालील गटात सचिन वराठा, विपुल वळवी, रोहन कोंब, विवेक चौधरी, यशराज चव्हाण यांनी ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. याच गटातील सचिन वराठा, रोहन कोंब, आकाश ठाकरे , प्रवीण धनगर आणि प्रतीक ठींगळे यांनी ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीला. रोहन कोंब याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय प्रतीक ठींगळे याने ४०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवीला.

१७ वर्षांखालील गटात प्रफुल्ल वसावे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तलवारे चेतन तलवारे याने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, किशो पावरा याने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक, तर ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
बांबू उडी या क्रीडा प्रकारात रोहन पावरा आणि नैतिक चौधरी यांनी प्रथम क्रमांक, तर राजवीर पावरा दिलबरसिंग आणि गौरव गावित यांनी द्वितीय क्रमांक मिळवीला. मुलींच्या गटातही गुरुकुलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. १९ वर्षांखालील गटात उर्मिला महाले हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय तसेच क्रॉस कंट्री स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला. अश्विनी भोये हिने द्वितीय, प्रीती चौधरी हिने तृतीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षांखालील गटात भावना भोय हिने बांबू उडीमध्ये प्रथम तर प्रीती खर्डे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील गटात पुजा ईभाड पूजा सुभाष हिने बांबू उडीमध्ये प्रथम क्रमांक तर पूनम पटले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील गटात आराध्या गुडघे हिने ८० मीटर हर्डल्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवीला. या खेळाडूंना प्रशिक्षक अजित पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वरपे श्रीमती मीरा पटेल तसेच गुरुकुलातील प्राचार्य माणिक जाधव, मीना काकडे, नितीन सोनवणे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.