Homeकोपरगावअवैध मटका-जुगार बंद न झाल्यास २ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन

अवैध मटका-जुगार बंद न झाल्यास २ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन

कोपरगावचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गगन हाडा यांचा प्रशासनाला इशारा

कोपरगाव :- शहरातील अवैध मटका-जुगार बंद करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा येत्या २ नोव्हेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोपरगाव शहरप्रमुख गगन हाडा यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात त्यांनी अवैध मटका – जुगार बंद करण्यासाठी निषेध आणि जनजागृती मोहीम सुरू असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रयत्नांनंतरही अवैध व्यवसाय बंद होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने जनतेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या ठिकाणी लोकांना सहकार्य करणे आवश्यक आहे, त्याच ठिकाणी जनतेला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही हाडा यांनी केला आहे.

जिल्हा प्रशासनाने या प्रश्नात योग्य ती दखल घेऊन आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अन्यथा २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी भावेश थोरात, निखिल कंक्राळे, लक्ष्मण साबळे उपस्थित होते. तत्पूर्वी, १९ ऑक्टोबरला शहर पोलीस निरीक्षकांना याबाबत निवेदन दिले होते. मात्र, तरी देखील कोणतीही कारवाई केली नसल्याचे हाडा यांनी निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!