Homeकोपरगावभोजडे सारख्या ग्रामीण भागातील कवी मराठी भाषा जतन संवर्धन करतील - हेमचंद्र...

भोजडे सारख्या ग्रामीण भागातील कवी मराठी भाषा जतन संवर्धन करतील – हेमचंद्र भवर.

कोपरगाव :- मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी ग्रामीण भागातील, शेतीत राबणाऱ्या कविंनी पुस्तक रूपाने समाजासमोर आले पाहिजे, ग्रामीण भागातील कवि मराठी भाषा जतन संवर्धन करतील याशिवाय वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल ” असे विचार वृत्तपत्र छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील कृषी कवी दत्तात्रय मंचरे यांनी शेती शेतकरी आणि मानवी नातेसंबंध जपत देशप्रेम व्यक्त करणारी कविता लिहिली याच कवितांचा एकत्रित काव्यसंग्रह,” सृष्टीच्या ओंजळीत “
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

समारंभाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ सिनगर नाना होते प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक भास्करराव काजळे, चारुदत्त सिनगर, प्रकाश गायकवाड, ह भ प ज्ञानेश्वर नरोडे,,आण्णासाहेब खिलारी, देवराम मंचरे, ग्रंथपाल महेश थोरात, भोजडे वाचनालयाचे अध्यक्ष शहाराम अनर्थे, उपाध्यक्ष शैलेश सिनगर उपस्थित होते.

मुख्याध्यापक भास्करराव काजळे यांनी कविता निर्मितीची कारणे उलगडून सांगितले चारुदत्त सिनगर मनोगतात सांगितले की दत्तात्रय मंचरे यांच्या कविता मनाला भुरळ घालणारी आहे आता त्यांनी कथालेखन केले पाहिजे त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आम्ही मदत करू. प्रा. प्रकाश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रास्ताविक अनिरुद्ध अनर्थे यांनी केले कवी दत्तात्रय मंचरे यांनी आपल्या मनोगतातून साहित्यिक प्रवास वर्णन केला
प्रकाशन समारंभासाठी ग्रामस्थ
वाचनालयाचे वाचक उपस्थित होते
अल्पोपहाराने समारंभाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!