Homeकोपरगावकुंभार समाजाच्या विकासासाठी संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड संचालक मंडळ घोषीत करावे

कुंभार समाजाच्या विकासासाठी संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड संचालक मंडळ घोषीत करावे

संपादक – राजेंद्र तासकर

              राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभार समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक विकासाच्या दृष्टींने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डची घोषणा करून १०कोटी रूपयांची तरतुद केली होती मात्र सत्तांतरानंतर महाविकासआघाडी शासनाने गेल्या अडीच वर्षात याबाबत कुठलीही बैठक न घेता अनुदानही जाहिर केलेले नाही तेंव्हा कुंभार समाजाच्या उत्कर्षासाठी गोरोबाकाका मातीकला बोर्ड संचालक मंडळाची तातडीने घोषणा करून त्यासाठी आर्थीक तरतुद करावी अशी मागणी येथील भाजपाचे गोपिनाथ गायकवाड,ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष जगदिश मोरे, कुंभार समाजाचे शहराध्यक्ष संदिप वाकचौरे,भाजपा उत्तर नगर जिल्हा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दिपक राउत यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 
       त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले की,राज्यातील सकल कुंभार समाजाच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडी शासनाने गेल्या अडीच वर्षात कुठलेही ठोस कार्य केलेले नाही त्यामुळे त्यांच्या धोरणाचा निषेध करून नाकर्त्या शासनाने कुंभार समाजाला वाळीत टाकले आहे. त्यांनी तातडीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डची घोषणा न केल्यास आघाडी सरकारच्या विरोधत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यांत येईल.त्याचबरोबर कुंभार समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबीत असुन त्यात कुंभार समाजाचा एन टी प्रवर्गात समावेश करावा,गोरोबाकाकांचे जन्मस्थान तेरढोकी(उस्मानाबाद) तीर्थक्षेत्रास देहु आळदींप्रमाणे पर्यटनस्थळाचा दर्जा देवुन त्याचा विकास करावा,कुंभार समाजाला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व द्यावे,मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी पूर्णपणे माफ करावी, माती वाहतुक व वीटभटटी परवान्याच्या जाचक अटी रदद करून कुंभार समाजाला ओळखपत्र द्यावे,अतिक्रमण झालेल्या कुंभार खाणीहस्तांतरीत कराव्यात,विटा,मुर्ती,कवेलु, मडकी विक्रीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका,महानगरपालिका हददीत तसेचअत्याधुनिक मॉलमध्ये जागा द्यावी,कुंभार मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा मिळावी,६० वर्षावरील कारागिरास मानधन सुरू करावे,विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतीगृह उभारावे,मुंबई स्थित धारावी कुंभार वाडयाला निवासी क्षेत्र जाहिर करून तेथील उद्योगाला एम आय डी सी क्षेत्रात स्वतंत्र जागा द्यावी,चंद्रपुर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्हयासह वनपरिक्षेत्रअसलेल्या जिल्हयातील कुंभार समाजाला अत्यल्प दरात जळाऊ लाकुड उपलब्ध करून द्यावे,कारागिरांना व्यवसायासाठी अद्यावत उपकरणे,साधने चाक,पेंटींग मशीन,माती मळण्याचे यंत्र, आधुनिक भटटी व कच्चामाल अनुदान तत्वावर उपलब्ध करून द्यावे,इंडिया युनायटेड मिल कमांक १मधील प्राचीनकालीन संत शिरोमणी गोरोबाकाकांचे मंदिर व २५ हजार चौरस फुट जागा तातडीने हस्तांतरीत व्हावी, हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देवुन अल्पव्याजदरांने शैक्षणिक कर्ज द्यावे,वीट व्यावसायिकांना अवकाळी पावसाने होणा-या नुकसान भरपाईसाठी विमा योजना सुरू करावी यासह अन्य मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर दत्तोबा जोर्वेकर, गणेश जोर्वेकर,दिलीप म्हस्के, बाळासाहेब जाधव,सुभाष जोर्वेकर,दत्तु इश्वरे,कृष्णा उपाध्ये, सागर टिळेकर,मच्छिंद्र इश्वरे, ज्ञानेश्वर वाकचौरे,संजय जोर्वेकर आदिंच्या सहया आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!