Homeकोपरगावकुंभारी नं.१ सोसायटीचाअमृत महोत्सव दिन विविध उपक्रमांनी साजरा

कुंभारी नं.१ सोसायटीचाअमृत महोत्सव दिन विविध उपक्रमांनी साजरा

संपादक – राजेंद्र तासकर

     तालुक्यातील कुंभारी परीसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत सिंहाचा वाटा असलेल्या सन १९४७ साली स्थापन झालेल्या कुंभारी नं.१चे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा ७५वा अमृत महोत्सवी वर्ष संस्थेच्या प्रारंगणात राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगीरीजी महाराज यांच्या हस्ते तसेच,चेअरमन ज्ञानदेव कदम,व्हा,चेअरमन सतिश कदम,संस्थेचे संचालक कदम विजयराव दगडु,कदम सुनिल ज्ञानदेव,ठाणगे सोपान कारभारी,कदम संजय उर्फ अरूण पुंडलिक,ठाणगे यमनाथ कचरू,कदम गजानन श्रावण,बढे सुभाष भाऊसाहेब,संचालिका कदम रंजना मच्छिंद्र,थोरात शारदा विलास,चव्हाण सुशिलाबाई मारूती,संचालक भारती जगन्नाथ कल्याण,संजय भागवत वारूळे,भागवत रायभान कदम,नितिन सुकदेव चिने तसेच सभासद वर्ग यांच्या उपस्थितीत  पर्यावरणाचा समतोलराखण्याच्या उद्देशाने संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद वर्ग तसेच   संस्थेचे सचिव भानुदास पानगव्हाणे,लिपीक खंडु चुंबळे या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे,मा.आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक,विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हि संस्था यशस्वी वाटचाल करत आहे." इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलु गेला गगणावरी " या प्रमाणे या संस्थेने शेतकऱ्यांना बीज भांडवल,रासायनिक खते,बी -बियाणे,शेतीऔजारे,अश्या विविध योजनेअंतर्गत आधार देण्याचे काम आजवर सातत्याने केले असल्याचे संचालक विजयराव कदम यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. 

संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिनानिमित्ताने ग्रामपंचायतचे सरपंच दिगंबर बढे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गरिबातील गरिब शेतकऱ्याला आपली उपजिवीका असलेली शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची गरज भागावी म्हणुन दुर दृष्टी ठेवून संस्था उभी राहिली तेव्हापासुन संस्थेच्या कार्यात हातभार लावणाऱ्या हितचिंतकांच्या उपस्थित वारसांचा जेष्ठ सभासदांचा तसेच जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव भानुदास पानगव्हाणे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!