
संपादक – राजेंद्र तासकर
कोणत्याही समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात शिक्षक हे दीपस्तंभ सारखे काम करत असतात असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के यांनी केले.
यावेळी जगधने सर,उल्हारे सर,खरात सर,तुपसुंदर सर, कांबळे सर,पोळ सर,सोळशे सर आदींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रमास राजेंद्र बागुल,सुनील पगारे,सोमनाथ म्हस्के,सोमनाथ ताकवले,शंकर बिऱ्हाडे,अमीन शेख आदी उपस्थित होते.