Homeकोपरगावकोपरगांव औद्योगिक वसाहतीची ६२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न निलेश होन आदर्श...

कोपरगांव औद्योगिक वसाहतीची ६२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न निलेश होन आदर्श तर जनार्दन वाके नव उद्योजक पुरस्काराचे मानकरी

कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहतीचे निलेश भास्कर होन यांना आदर्श तर जनार्दन वाके यांना नव उद्योजक पुरस्कार अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे,उपाध्यक्ष मुनिष ठोळे यांच्या हस्ते देण्यांत आले याप्रसंगी सर्व संचालक उपस्थित होते.

संपादक – राजेंद्र तासकर

         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी भारत देशाच्या उत्कर्षासाठी आत्मनिर्भरतेचा नारा देवून स्टार्ट अप इंडियाला प्रोत्साहन दिले.देशाच्या विकासात हरित,धवल क्रांतीबरोबरच औद्योगिक क्रांतीचाही मोलाचा वाटा आहे.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाला प्राधान्य देत त्यानुरूप कृती आराखडा आखून काम केले, तेंव्हा तरूण उद्योजकांनी औद्योगिक प्रगतीतुन तालुक्याच्या विकासात भर घालावी असे प्रतिपादन कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. 
       कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहतीची ६२वी वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. 
               प्रारंभी उपाध्यक्ष मुनिष माणिकचंद ठोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.संचालक केशव भवर यांनी प्रास्तविक केले.विषय पत्रिके वरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले.अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांसह मान्यवरांना व माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यांत आली.व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले ते सभासदांनी मंजुर केले. 
        श्री.विवेक भैय्या कोल्हे यांनी अहवाल सालातील उद्योगव्यवसायाचा आढावा घेवुन तालुक्याच्या व परिसराच्या औद्योगिक विकासात भावी काळातील योजनांची माहिती दिली.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव औद्योगिक विकासाचा प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. 
     कोपरगांव औद्योगिक वसाहतीत उत्पादने घेवुन ते राज्याच्या पसंतीला उतरतात त्याबाबत उद्योग व्यावसायिकांचे अभिनंदन करून उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी कै.भास्करराव दौलतराव होन यांनी १९८३ पासुन लक्ष्मी केमिकल्स औद्योगिक उत्पादन सुरू केलेअसुन त्यातुन सुपुत्र निलेश होन यांनी चांगली प्रगती साधली त्याबददल त्यांचा यावेळी आदर्श उद्योजक तर स्वामी ठिबक व स्प्रिंकलर २०१६ पासुन येथे उत्पादन घेतात त्याबददल जनार्दन पुंजाहरी वाके यांचा नव उद्योजक पुरस्कार देवुन त्यांचा यावेळी सन्मान करण्यांत आला.या दोन्ही उद्योजकांचे अनुकरण अन्य व्यावसायिकांनी करून औद्योगिक भरभराट साधावी असे ते म्हणाले.उद्योजक पुरस्कारचे हे पाचवे वर्ष आहे. 
       याप्रसंगी संचालक सर्वश्री. केशवराव भवर,अनिल सोनवणे,पराग संधान,रविंद्र नरोडे,सुकृत शिंदे,पंडीत भारूड,रविंद्र आढाव,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,रोहित वाघ,प्रशांत होन, सोमनाथ निरगुडे,राजेंद्र शिंदे,राजेश परजणे,ज्ञानेश्वर परजणे,वसंतराव देशमुख,संजय जगदाळे,हशमभाई पटेल,ज्ञानेश्वर वाकचौरे,भिमा संवत्सरकर,राजेंद्र रूपनर,अभिजित राहतेकर,संदिप बागी,सुनिल तिवारी, विजोग तिवारी,निलेश वाके,योगेश रहाणे,राजेश जाधव,चंद्रशेखर जाधव, अभिजित जाधव,रविंद्र शिंदे, विक्रमसिंग सारदा,बालाजी आंभोरे, सुशिल हंकारे,संदिप निकुंभ,सुधन चौधरी,विश्वनाथ भंडारे,मंगेश सरोदे, एकनाथ वाघ,अरविंद कडलग, कालुभाई पटेल,ज्ञानेश्वर नाईकवाडे, संदिप उंडे,योगेश वाडेकर,अरिफ शेख, संतोष जोर्वेकर,प्रदिप व्यवहारे, संजीवनी महिला रेडीमेड अँड गारमेट असोसिएशन,सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ,प्रदिप व्यवहारे,कपिल गुंजाळ,बाबासाहेब परजणे,बबनराव बनकर,महेश खडामकर यांच्यासह सर्व उद्योजक, सभासद,आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक पंडीत भारूड तर आभार संचालक रविंद्र नरोडे यांनी मानले.



     
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!