Homeकोपरगावकोपरगाव नगरपरिषदेने शहरातील प्रलंबितअंतर्गत रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी - शहर...

कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील प्रलंबितअंतर्गत रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी – शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे नगर परिषदेने हाती घेऊन सुरू केली परंतु, सात ते आठ महिने उलटून गेले तरी पण अंतर्गत रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.तरी या सर्व रस्त्यांची कामे नगर परिषदेने तातडीने लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी भालचंद्रजी उंबरजे यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रस्ता डांबरीकरण करणे,लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे,छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते गोकुळनगरी रस्ता डांबरीकरण करणे, श्री साईबाबा कॉर्नर ते मार्केट यार्ड रस्ता,डी.पी.रोड मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,प्रभाग क्र.७ व इतर सर्व प्रभागांतील अंतर्गत रस्ते आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरवके,संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे, अजीजभाई शेख,युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी,राहुल देवळालीकर, वाल्मिक लहिरे,आकाश डागा,संदीप सावतडकर,मुकुंद इंगळे,रहेमानभाई कुरेशी,डॉ.अनिरुद्ध काळे,मनोज नरोडे,गणेश लकारे,शुभम शिंदे, अजगरभाई खाटीक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!