
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने,' राष्ट्रीय ऊर्जा बचत दिनानिमित्त ' ऊर्जा बचत, नवनिर्माण साधने उत्पादक आणि ग्राहक खातेदारांना ऊर्जा बचतीचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे यांनी केले.तर प्रिसीजन मेडिकल केअरचे महेश महाले,श्री.संत हरीबाबा इलेक्ट्रीकलचे पानगव्हाणे,चंद्रमा कलर फोटोचे हेमचंद्र भवर यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व समजावून सांगितले व पर्यायी वस्तूंची माहिती दिली.
याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा बचत दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऊर्जा बचत काळाची गरज ओळखून प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी शाखेचे कर्मचारी, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव (नाना) यांच्या दुरदृष्टी संकल्पनेतून आजतागायत समाजपयोगी अनेकविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक सुधारणा आणि प्रेरणादायक असे उपक्रम शहरातील लौकिकात भर घालतात अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. यामध्ये शिक्षक दिन,अभियंता दिन, जेष्ठ नागरिक दिन,छायाचित्रकार दिन, नव्हे नव्हे पत्रकार दिनानिमित्त अनेक मान्यवरांचे सन्मान देखिल करण्यात आले हि गौरवाची बाब व्यक्त केली.
!! ऊर्जा बचत - काळाची गरज !!