Homeकोपरगावपन्नास हजार रूपयांचे अनुदानाचा कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना लाभ- जिल्हा...

पन्नास हजार रूपयांचे अनुदानाचा कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना लाभ- जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          कोपरगांव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमीत कर्जफेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन सदरची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तात्काळ जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.
         ते पुढे म्हणाले की,कोपरगांव तालुक्यात ७ हजार ४७७ कर्जदार शेतक-यांपैकी १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमित शेती कर्ज भरले असुन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.सदर कर्जदार शेतक-यांना पन्नास हजार रूपयांचे अनुदान रक्कम मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!