Homeकोपरगावकोपरगांव पोलिस स्टेशन मध्ये रेझिग डे सप्ताहाचे उत्साहाने आयोजन

कोपरगांव पोलिस स्टेशन मध्ये रेझिग डे सप्ताहाचे उत्साहाने आयोजन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

           माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिसविभागास ध्वज सुपूर्त केला होता.त्यादिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाचा २जानेवारी हा दिवस रेझिग डे म्हणून साजरा केला जातो.

     कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ८ जानेवारी हा 'रेझिंग डे' सप्ताह म्हणून साजरा केला जात असून  या निमित्ताने पोलीस ठाण्यात शाळेतील विद्यार्थ्यांना२४तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी माहिती व्हावी,यासाठी ‘भेट पोलिस स्टेशनला’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.शहर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील विदयार्थींनी नुकतीच या निमित्तानं पोलिस स्टेशनला भेट दीली.

  आज शनिवार दिनांक ७जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांतील विद्यार्थी,शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते.
             यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे,पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कार्य,पोलीस ठाण्यातील विविध विभाग,पोलिसांची शस्त्र,सायबर क्राईम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
               यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व मनुष्य,पक्षी व जनावरे यांच्या जीवाला धोका होऊ नयेयासाठी पतंगबाजी करताना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना व पालकांना केले आहे.
       यावेळी पोलीस ठाण्याला भेट दिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत होता.
    कोपरगांव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे,पोलीस उपनिरीक्षक संजय पवार,पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे शिक्षिका सौ.श्वेता मालपुरे मॅडम,अनिल काले,संजीवनी सैनिकी स्कुलचे शिक्षक व विदयार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!