
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
मागील दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेने अचानक २८ नोव्हेंबर ला पाणी आठवड्यातून एक दिवस म्हणजे ७ दिवसांनी पाणी देणार असे जाहीर केले.नागरिक विशेष करून महिला वर्ग खूप नाराज झाला. ख्रिसमस सण व मुलांना सुट्ट्या होत्या.नगरपालिकेने अचानक पाणी दिवस,पाटबंधारे विभाग यांनीकॅनॉलचे काम काढल्याचे सांगून पाणी दिवस वाढवले.यामुळे महिला वर्गाची खूप धावपळ झाली,त्यांना अतोनात त्रास झाला.एकीकडे धरणे भरलेली असताना व नदीला पाणी असताना कोपरगाव शहरवासियांना आठवड्यातून १ दिवस पाणी करण्यात आले ही खेदाची गोष्ट असल्याचे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.
आत्ता कॅनॉलला पाणी आले असून नगरपालिकेने सर्व साठवन तळे पूर्ण क्षमतेने आत्ताच सुरवातीला व पुन्हा कॅनॉल बंद होताना लक्षपूर्वक, काळजीने व जबाबदारीने भरून घ्यावे.जेणेकरून नागरिकांना येणाऱ्या काळात त्रास होणार नाही.त्यांची गैरसोय होणार नाही.कारण नगर पालिकेचा पाणी मंजूर कोठ्यापेक्षा नगरपालिका पाणी कमी घेते,कारण साठवण तळे गाळानी भरले असून, त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.त्यामुळे कॅनॉल सुटल्यावर व बंद होताना दोन्ही वेळा भरून घ्यावा, कारण आपल्याला आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मंजूर आहे आणि त्याची पट्टी नगरपालिका शासनाला पाटबंधारे विभागाला जनतेच्या कर रुपी भरलेल्या पैशातून देते.
तरी,नगरपालिकेनी पूर्वीप्रमाणे 3 दिवसाआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी पुरवठा तात्काळ करून नागरिकांना दिलासा द्यावा.ही नगरपालिका प्रशासनाला मागणी व विनंती.जसे हक्कानी पाणी पट्टी वसूल करता व पाटबंधारे विभाग यांचे सुचणे नुसार पाणी दिवस तात्काळ वाढवतात,तसे खरे तर जनतेनी मागणी न करता पाणी कॅनॉलला आल्यावर पूर्वीप्रमाणे लगेच मागणी करायला न लावता नगरपालिकेने स्वतःहुन पाणी दिवस कमी करायला पाहिजे.