
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव नगरपालिकेला नागरिक कर भरत नाही हे नगरपालीकेचे कामाचे अपयश असून शहरात ज्या सुविधा हव्या आहेत त्यासाठी नागरिक कर भरतात,त्या सुविधा नागरिकांना देण्यात नगरपालिका अयशस्वी झाल्यानेच जनता कर भरत नाही.आणि त्यातच शास्ती(व्याज)हे मोठ्या प्रमाणावर लावत आहे/घेत आहे,यासाठी नगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार सोई सुविधा द्याव्या आणि त्यानंतरच हक्काने पट्टी कर वसुली करावी असे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे.
श्री.पाटील पुढे म्हणाले कि,जनतेला नगरपालिकेकडून फक्त दररोज स्वच्छ पिण्यायोग्य चांगले पाणी,खड्डे विरहित चांगले रस्ते,धूळ विरहित गाव,चांगल्या प्रतिच्या आरोग्य सुविधा,दर आठवड्याला डासांसाठी औषध फवारणी,मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त त्याचबरोबर नागरिकांना आवश्यक असणारे दाखले,बांधकामासाठी परवानगी अगदी सहज आणि पटकन मिळावी अशाप्रकारच्या सर्व सोयी युक्त असे शहर निर्माण करावे,जेणेकरून शहरात रोजगार उपलब्ध होईल व गावाची बाजारपेठ वाढेल,व्यापार वाढेल अशा प्रकारचे शहर निर्माण करणे एवढीच माफक अपेक्षा जनतेला अनेक वर्षांपासून नगरपालिकेकडून अपेक्षित आहे.
आजही शहरात पिण्याचे पाणी आठ दिवसाआड मिळत आहे.ज्यावेळी कॅनॉलचे काम चालू होते त्यावेळी नगरपालिकेने चार दिवसा आडचे पाणी आठ दिवसाआड केले आणि नागरिकांना सांगितले की,काही दिवसातच कॅनॉलचे काम पूर्ण झाले की लगेच पाणीपुरवठा चार दिवसा आड सुरळीत चालू करू असे जाहीर केले होते.परंतु अद्याप दीड महिना होऊन गेला त्यानंतर आत्ता दुसऱ्यांदा कॅनॉलला पाणी येऊन गेले/आले.तरी देखील नगरपालिकेने पाणी पुरवठ्याचे दिवस कमी केले नाही.यामुळे नागरिकांमध्ये पालिकेविषयी विश्वासार्थ राहिला नाही.आजही शहरात पिण्यासाठी अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे.जर नगरपालिका दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची वार्षिक पट्टी आकारते/घेते आणि वर्षातून 365 दिवस पाणी देण्याऐवजी फक्त 36 ते 50 दिवसच पाणी देते आणि तेही गढूळ,गाळमिश्रित,दुर्गंधी येईपर्यंत अस्वच्छ असे पाणी देते.यामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारासह पोटाचे व अन्य आजार पसरत असून नागरिकांना बोरवेलचे पाणी पिणे भाग पडत आहे,बोरवेलचे पाणी पिऊन नागरिकांना अनेक विकार जडत आहे त्यांना होणाऱ्या त्रासास जबाबदार कोण ?असा सवाल नगरपालिका प्रशासनास माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नागरिकांच्या वतीने उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर आरोग्यास हानिकारक असणारी शहरातली धूळ अजूनही कमी झालेली नाही.त्यामुळे श्वासनाचे,डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे,या धुळीमुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच लागतो परंतु व्यापाऱ्यांना मात्र दुकाने व दुकानातील सामान स्वच्छ ठेवता ठेवता नाकी नऊ येत आहे.उत्पन्नापेक्षा स्वच्छतेवरच व्यापाऱ्यांचा खर्च वाढत असल्याची खंत श्री.पाटील यांनी व्यक्त केली.
नगरपालिकेकडुन शहरातील बरेचशे रस्ते अजूनही झालेले नाही आणि जे रस्ते झाले त्यांचे कामेही दर्जेदार झाली नाही असे प्रत्यक्षदर्शी लोक बोलत आहेत.त्यामध्ये संभाजी महाराज पुतळा ते इंदिरापथचे काम हे अर्धवट असून दर्जाहीन झाले.पुढे गोकुळ नगरीच्या वळणावर व तिथून पुढचा रस्ता तसाच राहिला आणि हा रस्ता फार मोठा करणार असं सांगण्यात आले होते,आणि याचे टेंडरही काढण्यात आले होते त्यामध्ये मोठ्या रस्ता होणार असे असताना देखील हा रस्ता छोटा झाला तोही अपूर्ण आहे.मग नगरपालिका प्रशासक काय देखरेख करते ?असा प्रश्न निर्माण होत आहे.त्याचबरोबर मार्केट कमिटी पासून कोळपेवाडी पेट्रोल पंपाच्या चौकापासून ते साईबाबा कॉर्नरला जोडणारा शॉर्ट कट रस्ता जो की शाळकरी मुलांसाठी,व्यापाऱ्यांसाठी,कॉलेजच्या मुलांसाठी खूप सोयीचा आहे.त्याचे टेंडर निघून एक वर्ष झाले.परंतु,अद्यापही त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही तसेच धान्य

मार्केटच्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून धुळीमुळे तेथे पायी चालणेही मुश्कीलिचे झाले आहेच पण तेथील दुकानदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून सर्वजण पालिका प्रशासनास सांगून वैतागून गेले आहेत.त्याच्यातच आत्ता रस्ता खोदून पिण्याची पाइप लाइन टाकली त्यामुळे आजुनच रोड खराब झाला व धूळ वाढली आहे.
सोमय्या कॉलेजला जाणारा छोटा पुलानंतरचा रस्ता ते तांडेल बंगला ते भेट नका या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अद्यापही पालिकेने ते बुजवन्याची साधी तसदीही घेतली नाही.त्यामुळे कोपरगाव शहरात बेट नाका रस्त्याने गावात येणारे लोक त्रास सहन करून नावे ठेवत आहे.तसेच शिर्डीला जाणाऱ्या रिक्षा व मोटरसायकल यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात आपटून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होउन आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे यामुळे नगरपालिका या कॉलेजच्या तरुणांसमोर निकृष्ट कामे करून काय आदर्श ठेवत आहे याचा विचार करावा असेही श्री.मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर बसस्टँड ते खंडक नाला रोडच्या बाजूला डांबरी रोडला मोठी कपार आहे.त्या ठिकाणी अपघात होऊन लोक पडत आहे.गावातील सर्वच रस्त्यांना मोठ मोठी स्पीड ब्रेकर आहेत ती छोटी आकाराची व त्रासदायक नसावी अशा पद्धतीने टाकण्यात यावी. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील

सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा बँक रोड,भाजी मार्केट रोड त्याची तर अक्षरशा खड्ड्यांनी चांगलीच वाट लागलीआहे. हा रस्ता एवढा महत्त्वाचा असून देखील पालिका त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.नगरपालिका नवीन बिल्डिंग, तहसील कार्यालय यांना खेटून जाणारा धारणगाव रोड ते टिळक नगर,जुने पोस्ट ऑफिस समोरील रस्ता की जो गांधीनगर च्या रस्त्याला जाऊन मिळतो,त्याचाही वरचा थर निघून त्या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.टाकळी नाका ते खडकी हा महत्त्वाचा रस्ता याची देखील खूप दैनीय अवस्था झालेली आहे.त्यामुळे सर्वांनाच त्याचा मोठ्या प्रमाणात जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे.

कोपरगाव शहरातील मेन चौकात भर रस्त्यात दोन चेंबर टाकले व कोपरगावातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर रस्ते व परत पाईपलाईन साठी ते रस्ते खोदून रस्ते होते का नव्हते असं खड्डेच खड्डे अशी रस्त्यांची अवस्था करून टाकली आहे.ह्या होणाऱ्या जनतेच्या पैशाची जणू काही उधळपट्टीच चालू आहे असं म्हणावे लागेल.तसेच नगरपालिकेने २८ कामाचा लेखी लेखाजोखा द्यावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली आहे.
कोपरगाव शहरात मेन चौकत दुकाने अगदी रस्त्यावर आल्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढली जाऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना तालुक्यातून येणाऱ्या लोकांना सर्वांना त्यामुळे तेथे ट्रॅफिक जाम होऊन मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.कोपरगाव शहरात कुठेही पार्किंगला नगरपालिकेने जागा ठेवलेली नाही.सप्तर्षी मळ्यामध्ये बांधलेले चांगले अद्यावत असे बाजार ओटे त्या ठिकाणी भाजीपाला विकणाऱ्यांना बसवण्यात नगरपालिका अपयशी ठरलीआहे.त्यामुळे सोमवारी भरणारा आठवडे बाजार हा संपूर्ण रस्त्यांवर भरतो व जे गाळेधारक दुकानदार आहेत त्यांचे त्यामुळे धंद्याचे मोठे नुकसान होत नाही आणि दुसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर स्वच्छता करण्याचा मोठा ताण पडतो ही नगरपालिकेची मोठी चूक आहे.
कोपरगाव शहरातील दत्तपार, गोदावरी नदी खालील भुयार, राघोबादादा वाडा,बेट भागातील पौराणिक शुक्रेश्वर,कचेश्वर मंदिर परिसर हा विकसित करण्यासाठी नगरपालिकेने सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून शिर्डीला येणारे लोक कोपरगावला येतील. आणि त्यामुळे पर्यटन वाढेल गावाची बाजारपेठ वाढेल/सुधारेल,रोजगार वाढेल.
कोपरगाव शहरात ना मुलांना खेळायला बाग आहे ना ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी, विरंगुळ्यासाठी जागा आहे,ना मुलांना खेळण्यासाठी मोठे ग्राउंड आहे.मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे खुलेनाट्यगृह कोपरगाव शहरात होते त्याचे देखील एक कोटी रुपयेचे टेंडर देऊन अद्यापनगरपालिका त्याचे नूतनीकरण करू शकले नाही. याचा जाब नागरिकांनी विचारला तर त्यांची चूक लपवण्यासाठी नगरपालिकेने ती वास्तू पडायला झाली जीर्ण झाली.यासाठी ऑडिट करायला दिले असून म्हणजे ती बिल्डिंगच नाट्यगृहाची पाडून टाकायची,अशी नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे व चर्चा आहे.

कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात हातावर मोल मजुरी करून लोक राहतात,त्यात गांधीनगर,संजय नगर, सुभाष नगर,खडकी,टाकळी नाका, टिळक नगर,जबरेश्वर मंदिर खालचा भाग,लक्ष्मीनगर,मोहिनीराज नगर, कोर्टरोड परिसर,बैल बाजार रोड, खंडकनाला परिसर,१०५अशा अनेक ठिकाणी मध्यमवर्गीय लोक राहतात.हे सर्वजण काबाडकष्ट करून मोलमजुरी करून आपले घरदार चालवतात. नुकताच कोरोना संपला असूनआत्ताच कुठं लोकांच्या व्यवसाय व कामे सुरळीत व्हायला लागली आहे.त्यात नगरपालिकेने कुठल्याही सुविधा न देता साधे पाणी देऊ शकत नाही आणि पट्टी वसूल करण्यात बळजबरी करत आहे.जर नगरपालिकेने या सुविधा दिल्याअसत्या तर नगर पालिकेवर पट्टी वसुलीची वेळच आली नसती व जनतेनेही ठेवली नसती.

स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ 75 वर्ष होत आले परंतु,आजही कोपरगावकरांना साधे पिण्याची स्वच्छ पाणीही मिळू शकत नाही याहून आणिक कुठलीच मोठी शोकांतिका नाही.४२ कोटी खर्च होऊनही स्वच्छ पाणी मिळत नाही.याला जबाबदार कोण.तसेच मोठ मोठे निधी येऊन सुद्धा कामे दर्जेदार व पूर्ण होत नसतील तर……. ?
नगरपालिका ज्या पद्धतीने पट्टी वसूल करत आहे तिच्याविरुद्ध मानव अधिकार संघटनेकडे तसेच स्वातंत्र्यसैनिक आण्णाजी हजारे यांच्याही कानावर या गोष्टी घालाव्या लागणार आहेत.त्यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे.नगरपालिके विरुद्ध तक्रार करावी लागणार आहे.
तरी नगरपालिकेला विनंती आहे की,तुम्हाला शासन मोठा पगार देते त्याबदल्यात तुम्ही आम्हाला या सर्व सुविधा लवकरात लवकर कागदपत्री नव्हे तर प्रत्यक्ष लोकांना दिसतील जनतेला दिसतील अशी दर्जेदार करून दिलासा द्यावा व त्यानंतरच हक्काने पट्टी वसूल करावी ही नगरपालिकेला तमाम नागरिकांच्या वतीने माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी विनंती केली आहे.