
मुष्प संपादक -राजेंद्र तासकर
भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोपरगाव तालुक्यासह व शहरातील नवनिर्वाचित निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन शासन दरबारी न्याय मिळवून देण्यास प्रोत्साहन मिळावे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी त्याचबरोबर शहरासह तालुक्याचा विकास करण्यास त्यांना ताकद मिळावी या उद्देशाने शहरासह तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे,ता.सल्लागार सोमनाथ लोहकरे,शहराध्यक्ष रामदास कोपरे,ता.उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव,शहर उपाध्यक्ष अनिस शेख,शहर उपाध्यक्ष अमोल थोरात आदि उपस्थित होते.
यावेळी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे व शहराचे प्रतिनिधी या सर्वांनाच कोपरगाव तालुक्यासह शहराच्या विकासासाठी जनतेच्या मनातील प्रश्न शासन दरबारी, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी हे सर्व पदाधिकारी व संघटनेचे सर्व सभासद हे सर्व समाजाला बरोबर घेऊन एकदिलाने काम जनतेसाठी करणार आहेत.या सर्वांना माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या हितावह,कामासाठी नगरपालिकेतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच या सर्वांबरोबर राहणार असे माजी.नगराध्यक्ष पाटील यांनी शेवटी सांगितले.

