Homeकोपरगावअनेकविध प्रकारच्या गितांची मेजवानी देऊन नवीन वर्षाचे स्वागत ;पहाट पाडवा संपन्न

अनेकविध प्रकारच्या गितांची मेजवानी देऊन नवीन वर्षाचे स्वागत ;पहाट पाडवा संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       कोपरगाव साईगाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समितीच्या वतीने,शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने,पहाट पाडवा हा भक्तीगीताचा समारंभ संपन्न झाला.
संगीत विद्यालयाच्या आबालवृद्धांनी अनेकविध प्रकारच्या गितांची मेजवानी देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.सर्वच गितांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
    जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, कैलासशेठ ठोळे,विजय बंब,उत्तम भाई शहा,डॉ विलास आचार्य,साई सेवा भक्त मंडळाच्या जेष्ठ महिला भगिनी,(आर टी ओऑफिसर ) आदींच्या हस्ते (ब्रम्हधवज) गुढीचे पुजन करून गुढी उभारण्यात आली.  संगीत विद्यालयाच्या संचालीका,केतन कुलकर्णी,सुरभी कुलकर्णी आदींचा मंचच्या वतीने सत्कार करण्यातआला.
           पहाट पाडवा समारंभासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,लेखा परीक्षक नितीन डोंगरे, माजी.नगराध्यक्ष विजय वहाडणे, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
          पहाट पाडवा संपन्न झालेवर महिलांची दुचाकी शहर फेरी संपन्न झाली.या निमित्ताने सर्व शहरात प्रसन्न, भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!