Homeकोपरगाव"माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवांचे झाले लोकार्पण "

“माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवांचे झाले लोकार्पण “

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

   माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अभिवादन करून विविध लोकोपयोगी उपक्रम भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
       कोपरगाव अमरधाम येथे संजीवनी उद्योग समूह व अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून प्रवचनकार बैठक कक्ष,विसावा ओटा,अस्थीकलश ठेवण्याचे कपाट यांचे लोकार्पण मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व प्रजापिता ब्रम्हकुमारी कोपरगाव केंद्राच्या प.पूज्य सरलादीदी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
      स्व.कोल्हे साहेब यांच्या विचारांवर प्रेरित राहून अनेक कार्यकर्त्यांचेआयुष्य घडले.त्यांनी संस्कराशिलसमाजकारण करून सर्वसामान्यांचे प्रश्नसोडविण्याचे काम केले.छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी मंत्री स्व.कोल्हे साहेब यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नूतन वैकुंठ रथ लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
        स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जीवनाचा सेवा हा मूलमंत्र राहिला.त्यांनी आमच्यावर सेवेचे संस्कार केले जे मी आयुष्यात रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत जपून साहेबांचा वसा पुढे नेणार आहे.जी माणसे त्यांनी आयुष्यभर जोडली ती आमचे कुटूंबीयच आहेत असे मानून त्यांना आमचे कोल्हे कुटूंब कधीही अंतर देणार नाही.माणूस जिवंत असे पर्यंत सर्वच विचारपूस करतात पण एखादा माणूस निधन झाल्यानंतर त्याकुटूंबाला त्या व्यक्तीला अखेरचा निरोप देतांना येणाऱ्या अडीअडचणी ओळखून त्यात हातभार लागावा अशी भावना ठेऊन विविध सेवांचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. अनेक युवकांनी किराणा किट,कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरनेने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून साहेबांना अभिवादन केले.वेळ कोणतीही असो आपण समाजासाठी कार्य करायचे हा स्व.कोल्हे साहेबांचा संस्कार या प्रकारे नेहमी तेवत राहील अशी भावना सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
     स्व.शंकररावजी कोल्हे साहेब हे अखेरपर्यंत जनतेच्या सेवेत कार्यरत असणारे लोकनेते होते.प्रश्नांना वाचा फोडणे आणि ते तडीस लावणे हा स्थायीभाव असणारे जनमान्य हृदयनायक म्हणून त्यांचा ठसा तहहयात अजरामर आहे.
        केवळ जयंतीनिमित्त स्मरणात रहाणारे नाही तर कोल्हे साहेब हे सुर्यासारखे तेजस्वी कार्य करणारे विकाससूर्य होते,सेवा आणि सेवा हाच ध्यास मानून कोल्हे साहेब यांनी आपले आयुष्य समर्पित केले.संपूर्ण कोल्हे कुटूंब हे सेवा हाच विचार मानून कार्य करत आहे.या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शरीराने ते आपल्यात नसतील तरीही कार्याने मात्र साहेब सर्वांच्या पाठीशी आहेत अशी भावना प.पूज्य सरला दीदी यांनी व्यक्त केली.
         याप्रसंगी दिलीपभाऊ दारुणकर,बाळासाहेब नरोडे, शरदनाना थोरात,परागजी संधान,दत्तात्रय काले,रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे,योगेश बागुल,अतुल शेठ काले,विजयराव आढाव,उद्धवशेठ विसपुते,जितेंद्र रणशूर,बबलूशेठ वाणी,विनोद राक्षे,अशोकराव लकारे,संजयराव जगदाळे,गणेशराव आढाव, संदीपराव देवकर,उल्हास बापू पवार,कैलासभाऊ जाधव,राजेंद्र बागुल,सौ.वैशालीताई आढाव,सौ.विद्याताई सोनवणे,सौ. शोभाताई पवार,सौ.विजयाताई देवकर,सौ.सुवर्णाताई सोनवणे, विजयराव वाजे,स्वप्नील निखाडे,जनार्दन कदम,अल्ताफ कुरेशी, दिनेश कांबळे,अविनाश पाठक,वैभव आढाव,रवींद्र रोहमारे, गोपीनाथ गायकवाड,राजेंद्र लोखंडे,नरेंद्र डंबिर,राहुल सूर्यवंशी, मनील नरोडे,विनोद गलांडे,खालिकभाई कुरेशी,जगदीश मोरे, विक्रमादित्य सातभाई,प्रसाद आढाव,पप्पू पडियार,रंजन जाधव, सतीशराव रानोडे,हशमभाई पटेल,महेश खडमकर,किरण सुपेकर,विष्णुपंत गायकवाड,दादाभाऊ नाईकवाडे,रवींद्र सोमासे, जयेश बडवे,दीपक जपे,भानुदास कुहिले,संतोष नेरे,अनिल गोडसे,बंटी पांडे,सलीम पठाण,सद्दाम भाई सय्यद,अहमद भाई बेकरीवाले,आबा नरोडे,संतोष साबळे,रोहित आढाव,विजय चव्हाणके,सुशांत खैरे,सचिन सावंत,सागर जाधव,गोपी सोनवणे,संदीप ढोमसे,मुकुंद उदावंत,शंकर बिऱ्हाडे, फकीरमहम्मद पैलवान,रहीमभाई शेख,राजेंद्र गंगुले,सोमनाथ मस्के,अभिजीत मंडलिक,गोपीनाथ चव्हाण,हेमंत चव्हाण, बाळासाहेब राऊत,बाळासाहेब मंडलिक,स्वप्निल कडू,मुसाभाई मुलानी,समीर सुपेकर,काका पुरंदरे,बाळासाहेब राक्षे,मुख्तार शेख,नंदू वायडे,नरेंद्र जाधव,आशिष उदावंत,मुख्तार शेख आदिंसह भाजपा,शिवसेना मित्रपक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!