
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२ / २३ गळीत हंगामाची सांगता २७ मार्च रोजी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता संचालिका सौ. सोनिया व बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पुजेने संपन्न होत आहे.
सदरचा कार्यक्रम संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे सर्व संचालक यांचे प्रमुख उपस्थीतीत तर अभ्यासु युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यांत आला आहे,तरी या कार्यक्रमांस जास्तीत जास्त सभासद,शेतकरी बांधवांनी उपस्थीत रहावे असे आवाहन उपाध्यक्ष रमेश घोडेराव,कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार,साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,जी.बी.शिंदे, शिवाजीराव देवकर आदिंनी केले आहे.