Homeकोपरगावकेंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीसाठी जास्तीचे आर्थीक सहाय्य देवून कच्च्या तेलाची...

केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीसाठी जास्तीचे आर्थीक सहाय्य देवून कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलन वाचवावे – बिपीनदादा कोल्हे

कोल्हे कारखाना उस बेणे मळयात ६ हजार विकसीत जाती.

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी कमी पाण्यात दर्जेदार बेण्यांत उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला तोच आदर्श ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या उस बेणे मळ्यात ६ हजार विकसीत उस जाती असुन त्याचा देश विदेशात प्रसार सुरू असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाची सांगता सोमवारी झाली त्याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सभासद शेतक-यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे,उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक उपस्थित होते.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी,केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना निर्देश देवुन त्याबाबतचे धोरण आखून सुमारे दहा हजार कोटी रूपये आयकर माफ केला ही बाब स्वागतार्ह असून साखरधंद्याला आणखी बळकटी येण्यांसाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीला जास्तीचे आर्थीक सहाय्य द्यावे जेणेकरून आपल्या देशात कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलनात मोठया प्रमाणांत बचत होईल अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. 
       सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संचालिका सौ.सोनिया व बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पुजेने झाली.त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिकीकरणासहसंगणकीकरणाला प्राधान्य देत सुधारणा करूनमार्गक्रमण सुरू ठेवले असून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे संकल्पनेतुन उसतोडणी यंत्रे व ड्रोन खरेदीसाठी कारखान्यामार्फत प्रोत्साहनपर अनुदान,पेपरलेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकी करण,उस उत्पादकता वाढ व खोडवा उस पीक व्यवस्थापक यासाठी विभागीय मेळावे,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन,एसएसआरडी कोईमतूर यांचे सौजन्याने शेतक-यांच्या बांधावर मार्गदर्शन तसेच आर्थिक शिस्त व गतीमान प्रशासकीय कामकाज, प्रशासकीय शिस्त,विना अपघात कारखाना कामकाज,उस उत्पादक शेतक-यांसह कामगारांचे हित,सर्व संगणकीकरण कामकाज या पंचसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मनोदय कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार यांनी शेवटी व्यक्त केला.
उपाध्यक्ष रमेश घोडेराव,साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे,एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.
श्री.बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की,कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सभासद शेतक-यांचे प्रती एकरी उसासह सर्व पिकांचे उत्पादन वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम हाती घेवुन कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ करून तंत्रशुध्द मार्गदर्शनाने उस लागवड करून उपग्रहाद्वारे उतारा, तोडणी कार्यक्रमासाठी संगणकीय थ्री डब्ल्यू डी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारा देशातील एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना आहे. कार्यक्षेत्रातीलसभासद शेतक-यांचे उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्यांने प्रती एकरी उस व साखरेचे उत्पादन देणा-या उस जातींचे सुमारे सहा कोटी रूपयांचे उस बेणे सभासद शेतक-यांना निःशुल्क पुरविले आहे.
बिबटयासह हिंस्र प्राण्यांचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतक-यांच्या सुरक्षीततेसाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने केंद्र व राज्य शासनाच्या सर्व परवानग्या घेवुन राज्यात सर्वप्रथम ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीकावर किटकनाशक फवारणी कार्यक्रम माफक दरात शेतक-यांच्या बांधापर्यंत उपलब्ध करून दिला आहे.त्याचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा.


माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर साखर कारखान दारीच्या यशासाठी आधूनिकीकरणाची कास धरली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू आहे.केंद्र शासन यापुर्वी परकीय चलनासाठी साखर निर्यातीवर विविध अनुदाने देवुन त्याबाबतचे धोरण अवलंबवत होते, त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या आयातीवरही भारत सरकारला मोठया प्रमाणांत आर्थिक झळ सोसावी लागते तेंव्हा ती थांबविण्यासाठी येथीलसाखर उद्योगामार्फत इथेनॉल निर्मीतीसाठी जास्तीचे आर्थीक सहाय्य केंद्रशासनाने देवुन त्याबाबतचे निश्चित धोरण घेण्यासाठी तातडीने पावले उचलावी, साखर निर्यात कमी करून साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मीतीसाठी प्राधान्य द्यावे.देशांतर्गत जेव्हढा साखरेचा खप आहे तेंव्हढीच साखर निर्मीती करावी असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमांस संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,ज्येष्ठ नेते कृषिरत्न दत्तात्रय कोल्हे,संचालक बाळासाहेब वक्ते,रमेश आभाळे,ज्ञानदेव औताडे, मनेष गाडे,विलासराव वाबळे,राजेंद्र कोळपे,ज्ञानेश्वर परजणे,त्रंबकराव सरोदे,विलासराव माळी,निलेश देवकर,संजयराव औताडे,सतिष आव्हाड,माजी सभापती शिवाजीराव वक्ते,मच्छिंद्र केकाण,सुनिल देवकर, अंबादास देवकर,बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड,अरूणराव येवले, शरद थोरात,दगुराव चौधरी,साहेबराव रोहोम,वाल्मीकराव भिंगारे,बाळासाहेब नरोडे,रिपाई नेते दिपकराव गायकवाड, सोपानराव पानगव्हाणे,प्रदिप नवले, केशव भवर,राजेंद्र परजणे,फकिरराव बोरनरे,अशोक औताडे,जयराम गडाख,कामगार नेते मनोहर शिंदे, गणपतराव दवंगे,मोहनराव वाबळे, राजेंद्र लोणारी,यादवराव संवत्सरकर, कैलास संवत्सरकर,रामदास शिंदे, राजेंद्र सोनवणे,रविंद्र पाठक,स्वप्नील निखाडे,सुनिल वाणी यांच्यासह विविध क्षेत्रातीलमान्यवर आजी माजी संचालक,उस उत्पादक सभासद शेतकरी,उसतोडणी वाहतुकदार, कंत्राटदार मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

      




      
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!