Homeकोपरगावश्रीरामनवमी निमित्त श्रीक्षेत्र कुंभारी ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडी "साई पालखी सोहळ्याचे...

श्रीरामनवमी निमित्त श्रीक्षेत्र कुंभारी ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडी “साई पालखी सोहळ्याचे “आयोजन !!

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व कोपरगाव आश्रमचे मठाधिपती प.पु.स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व गोदावरीच्या तीरावर वसलेले कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान एक रमणीय व धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.हे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले एक तीर्थक्षेत्र असून तेथील मठाधिपती श्री.श्री. १०८ महंत राघवेश्वरानंदगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामनवमी निमित्त "साई पालखी सोहळा "आयोजित करण्यात आला आहे.त्याचबरोबर भाविकांना महंतांच्या प्रवचनाचा व दर्शनाचाही लाभ होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती आयोजकांकडुन करण्यात आली आहे.
     वर्षे १४वे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमीनिमित्त श्री क्षेत्र कुंभारी ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडीचे आयोजन गुरुवार दि.३० मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे. तरी ज्या भाविक- भक्तांना पायी दिंडीत जायचे आहे अशा भाविकांनी कुंभारी येथील राघवेश्वर मंदिराजवळ येण्याचे करावे.दिंडीचे प्रस्थान ठिक दुपारी ३:०० वाजता राघवेश्वर मंदिरापासून होणार आहे याची भाविक भक्तांनी नोंद घेऊन वेळेवर हजर व्हावे. त्याचप्रमाणे पालखी भंडारा हनुमान जयंतीच्या दिवशी गुरुवार दि.६ एप्रिल २०२३ रोजी ठिक ७ :०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडुन करण्यात आली आहे.
           स्त्रियांनी आपले मौलवान वस्तु :जसे की, दागीने,मोबाईल,पर्स अशा वस्तु जवळ बाळगू नये चोरी जाण्याची दाट शक्यता असते आणि ज्यांना अशा वस्तु सोबत घ्यावयाच्या आहे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेणे चोरी गेल्यास त्यास कोणीही जबाबदार राहणार नाही असे ही सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!