Homeकोपरगावदिव्यांगांचे मुंबई मंत्रालयावरील आत्मदहन आंदोलन यशस्वी

दिव्यांगांचे मुंबई मंत्रालयावरील आत्मदहन आंदोलन यशस्वी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे नेते व संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अनिस भाई शेख यांच्या मार्गदर्शना खाली व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंदा पाटील,भाऊसाहेब दशपुते राज्यसंपर्क प्रमुख,सौ.कुसूम सुकासे महिला महाराष्ट्र अध्यक्ष,कलिम शेख राज्य सचिव,रजिक शाह राज्य महा सचिव,अकिल शेख जेष्ठ राज्य उपाध्यक्ष,सौ.पुष्पा नाईक महिला राज्य उपाध्यक्षा,रमेश मोहिते राज्य उपाध्यक्ष,मयूर पाटील राज्य उपाध्यक्ष,लक्ष्मण वाघे राज्य उपाध्यक्ष,शकिर अन्सारी मुंबई उपाध्यक्ष,अॅड.जहुर इनामदार राज्य कायदेशीर सल्लागार,राजेंद्र शेंडगे अ.नगर जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष जाकिरभाई शेख व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोर सोमवार दि.२७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ :०० वाजता पुकारलेल्या आत्मदहन आंदोलनाला घोषणा देत सुरुवात झाली.
       दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान १०००रू. वरून ३०००रू देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मुंबई येथे थेट मंत्रालयावर आत्मदहन आंदोलन नेण्यात आले,काही दिव्यांग बांधवांना मुंबई पोलिसांनी व्हीटी रेल्वे स्टेशनवर आटकाव करून शासकीय गाडीत बसवून आझाद मैदानावर नेऊन सोडण्यात आले व मैदानाबाहेर जाण्यास रोखण्यात आले त्यावेळी रमेश मोहिते या दिव्यांग तरूणाने स्वतःच्या अंगावर डिजेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता मुंबई पोलीसांनी प्रसंगावधान लक्षात घेऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील अनर्थ टळला,त्यानंतर दुपारी ३:०० वाजता मंत्रालयाचे प्रधान सचिव मा.अभय महाजन यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळाबरोबर दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली, येत्या १५ दिवसात दिव्यांगांच्या उपस्थित प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन देण्यात आल्यानंतर आत्मदहन आंदोलन सायंकाळी ५ वाजता स्थगित करण्यात आले.
           यावेळी अपंग जनता दलाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अंनिस भाई शेख,महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे,अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेंडगे,जिल्हा संघटक शब्बीर भाई शेख,अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र तासकर,शहराध्यक्ष विकी भोकरे,शहर सचिव आदित्य निकुंभ,अशोक पगारे,सोमनाथ उबाळे,तुळशीराम जोरवर यांच्यांसह संघटनेचे विविधपदाधिकारी व अहमदनगर जिल्हयातून ३०ते ४० दिव्यांग बंधु -भगिनी आत्मदहन आंदोलनात सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!