Homeकोपरगावकोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी नंदू उसरे तर...

कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी नंदू उसरे तर सचिव पदी प्रकाश देशमुख यांची निवड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        कोपरगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच आत्मा मलिक शैक्षणिक संकुल या ठीकाणी संपन्न झाली.प्रारंभी आत्मा मलिक संकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सर्वाचे स्वागत केले.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.सुनिल पंडीत हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव मकरंद को-हाळकर यांनी केले.त्यांनी मा.सुनिल पंडीत यांची राज्य शिक्षक परीषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दील्या.प्राचार्य सुनिल पंडीत यांनी मुख्याध्यापक शाळेचा कणा असुन त्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी या संघटनेचे महत्व आहे असे स्पष्ट केले. कोपरगांवतालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची निवड या प्रसंगी जाहीर करण्यात आली.मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी न्यु इंग्लिश स्कूल पढेगाव येथिल मुख्याध्यापक नंदू नाना उसरे यांची तर सचिव पदी न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड येथील मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली
            यावेळी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष निवृत्ती इले,संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे,मुख्याध्यापक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजेंद्र सोनवणे,अकोले तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव तुरा कानवडे,संघाचे बाळासाहेब वाकचौरेआदी उपस्थित होते.पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली.यामध्ये कोपरगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून बाळू बिरे,सहसचिव म्हणून मीराताई जोशी तर खजिनदार म्हणून राजेंद्र पाचोरे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय शिंदे,निरंजन डांगे,वसंत बागल,एम.आर.शेख,वंदना मराठे,प्रशांत गाडे,गणपत मंडलिक,चिलीया जगताप,विश्वनाथ शेळके,बाळासाहेब गुडघे,तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मकरंद कोऱ्हाळकर व सुनिता पारे आदींची निवड करण्यात आली.
         नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी या शैक्षणिक वर्षातील निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र संचलन तालुका मुख्याध्यापकांचे सचिव प्रकाश देशमुख यांनी केले.आभार नुतन अध्यक्ष नंदु उसरे यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!