Homeकोपरगावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कुंभारी येथे उत्साहात साजरी
मुख्य संपादक राजेंद्र तासकर
तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामपंचायत प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती बुधवार दि.३१मे२०२३ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विशेष योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय दोन महिलांना सन 2023 /2O24 वर्षीचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
”जनसेवा हीच ईश्वर सेवा” मानुन कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता इतरांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन,सल्ला व धीर देऊन आणि योग्य ती मदत करून “समाजाचे आपण काही देणे लागतो” या

भावनेतून आपले कर्तव्य करणाऱ्या कुंभारी उपआरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सौ.मनीषा अनिल पवार यांचा सन्मान ग्रा.सदस्या सौ.सिंधुताई वसंत घुले यांच्या हस्ते त्याचबरोबर

दिव्यांग असतांना धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य व अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असणाऱ्या परिघा राजेंद्र सूर्यवंशी यांचा सन्मान गावातील जेष्ठ महिला श्रीमती. चंद्रकलाबाई मुळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी प्रशासक मा.वाघमोडे बी.बी.साहेब,सरपंच दिगंबर बढे, ग्रा. सदस्य सिंधुताई घुले,ललित निळकंठ, आशिष थोरात,वसंत लक्ष्मण घुले, ग्रामसेवक कासवे साहेब,कोतवाल नारायण ठाणगे,ग्रा.शिपाई रविंद्र व्हरे, पंपमन शंकर चंदनशिव,आरोग्य विभागाचे डॉ.अंत्रे,अंगणवाडी सेविका, मदतनीस आदि विविध विभागाचे कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!