Homeकोपरगावसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कामगारासह सर्वांचा आधारस्तंभ -एस.एन.पवार

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कामगारासह सर्वांचा आधारस्तंभ -एस.एन.पवार

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील सर्वांगीण प्रगतीसाठी साखर कारखान्यासह विविध संस्थांची मुहूर्तमेढ रोवली आज त्याचा वेलू गगनावर पोहोचला असून कामगारांसह सर्वच घटकांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन मुख्य लेखापाल एस.एन. पवार यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यालेखाशाखेचे भानुदास घुले,दिनकर पवार,भास्कर काळे,चांगदेव कदम प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा कारखाना कार्यस्थळावर बुधवारी सत्कार करण्यांत आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी लक्ष्मण वर्पे यांनी प्रास्ताविक केले.कामगार नेते मनोहर शिंदे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी संस्थेचे वैभव वाढविण्यासाठी जे जे उपक्रम हाती घेतले त्याला कामगारांसह सर्वच घटकांनी मोलाची साथ दिली आहे.
श्री.एस.एन.पवार पुढे म्हणाले की, मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक,बौध्दीक,आर्थिकबळाबरोबरच राजसत्तेचे सहकार्य हवे असते ते उभारण्यासाठी माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहे.कारखान्याचे अभ्यासु अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे हे साखर कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञानासह कामगारवर्गाच्या प्रगतीसाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. सेवानिवृत्तीनंतरही कामगारांनी संस्थेच्या प्रती असलेला जिव्हाळा जोपासून सहकार्य करावे.शेवटीउपमुख्यलेखापाल प्रविण टेमगर यांनी आभार मानले.याप्रसंगी सर्वश्री वेणुनाथ बोळीज, देवराम देवकर, भास्कर बेलोटे,धनंजय होन,यांच्यासह विविध खाते प्रमुख,उपखाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!