
कोपरगावातील भाविक भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
आज दोन एस टी महामंडळाच्या बस भरून भाविक कोपरगावातून पंढरपूरला ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी रवाना झाले.या एस टी बसचे श्रीफळ वाढवून पुजन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते करून गाड्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले.
भागवतरसज्ञ,साई कथाकार ह भ प श्री बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या मधुर वाणीतून या भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरात आयोजन करण्यात आले आहे.जवळपास शंभर भाविक महिला व पुरुष कोपरगावातून ८ दिवसासाठी सहभागी झाले आहेत.

वर्षभर श्री बाळकृष्ण महाराज यांच्या वाणीतून नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाराजांचे प्रवचने सतत चालू असतात.या कार्यक्रमाचे नियोजन श्री.तांबट साहेब व त्यांचे सर्व भजनी मंडळ हे करतात.यावेळी भोजनासह सर्व खर्च श्री बन्सीभाऊ मोरे व इतर दानशूरांनी उचलला आहे.
सुरासे महाराजांसोबत,ह भ प भाऊसाहेब महाराज नाईक,ह भ प भाऊसाहेब महाराज जाधव,ह भ प अशोक महाराज नाईक,ह भ प कैलास महाराज जाधव,हरिदास महाराज ढगारे,ह भ प विलास महाराज नाईक, ह भ प रामेश्वर महाराज जाधव,ह भ प दत्ता महाराज जेजुरकर,ह भ प बाळासाहेब महाराज कुळधरण सर ही देखील महाराज मंडळी सहभागी आहे.

दोन्ही एस टी बसचे वाहन चालक यांचे यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बन्सी भाऊ मोरे,फोटोग्राफर हेमचंद्र भवर,संतोष भाऊ सोनवणे यांच्यासह अनेक भाविक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.