
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेंडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी 9ते दुपारी 3 वाजेपर्यंत इतरत्र खर्चाला फाटा देऊन दिव्यांगांनी दिव्यांग बंधु भगिनींसाठी एक आगळा वेगळा उपक्रम दि.१जून२०२३ रोजी राबवून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

“एकमेका सहाय्य करो| अवघे धरू सुपंथे” या संतांच्या उक्तीप्रमाणे अपंग जनता दल सामजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेडगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व आपल्या संकल्पनेतून दिव्यांगांना रेल्वेच्या सवलतीचा पास मिळावा तसेच युनिक आयडेंटिटी कार्ड मिळावे यासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली.त्या अनुषंगाने रेल्वे पास साठी ५० तर युनिक आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी ३० दिव्यांग बंधू भगिनींनी आपले नाव नोंदणी करून घेतली.त्याचप्रमाणे अपंग जोडो अभियान,संघटनेची सभासद नोंदणी ही करण्यात आली.

आलेल्या दिव्यांगांनी श्री.लांडे व श्री. शेंडगे यांचा वाढदिवसानिमित्त शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना श्री.शेंडगे म्हणाले कि,कागदपत्रांची पुर्तता केलेल्या दिव्यांगांना वरील योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेंडगे व अहमदनगर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र तासकर हे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक सोमनाथ उफाडे,सामाजिक कार्यकर्ते किशोर हिवरे तसेच कोपरगाव शहराध्यक्ष अफजल पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.तर शेवटी बाळासाहेब लांडे यांनी सर्वांचे आभार मानले.