
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
एकेकाळची लावणी सम्राज्ञी,जिच्या अदाकारीने व सौंदर्या ने अनेक रसिक घायाळ होत होते.अशा महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी शांताबाईकोपरगांवकर उर्फ शांताबाई अर्जुन लोंढे यांना रस्त्यावर भिक मागण्याची वेळ आली आहे.
चाळीस वर्षापूर्वी मुंबईच्या लालबाग परळ हनुमान थिएटर येथे वन्स मोर,टाळ्या,शिट्ट्या शांताबाईसाठी वाजत होत्या.पण आज कोपरगांव बस स्टॅन्ड हेच तीच घर असुन,पोट भरण्या साठी त्या दिवसभर भिक मागत फिरतानां दिसत होत्या,कुणाला ती वेडी वाटते तर कुणी तिला दगड मारते,अंगावर एकच मळकटलेली साड़ी व ब्लाऊज तसेच हातात एक गाठोड़,गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हाट्सएप,फसेबूक,इंस्टाग्राम वर एक़ा वयोवृद्ध महीलेचा एक फुगड़ी माज़ी साडंलीग,ही लावणी म्हणतानाचा वीडियो वायरल झाला.पण ही महिला कोण व कुठली याचा उलघड़ा होत नव्हता परंतु, या विडियोतील तिचा आवाज,अदाकारी,बघून ही कोणीतरी मुरब्बी कलाकार आसावी अस जाणवतं होत.
महाराष्ट्रातील अनेक व्हाट्सएप ग्रुप वर हा विडियो वायरल झाला व तो विडियो विठा भावु मांग यांचे नातू मोहित नारायणगावकर यांच्या तमाशा कलावंताच्या ग्रुपवर आला व त्याची ओळख शेषराव गोपाल यांना झाली व त्यांनी ती अतिशय प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी असल्याचे सांगितले,खानदेश भागात त्यांचा विशेष वावर राहिला आहे.त्यांनी आत्तापर्यत पिंजारी वडितकर,भिका भीमा संगविकर,धोन्दू – कोदू सिंधिकर,हरिभावु अनवीकर, शंकरराव खिर्दिकर,आदिच्या तमाशात लावण्या गाजविल्या आहे.

ही माहिती मिळताच कोपरगांव येथिल सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावित्रे यांनी तिचा कोपरगांव येथे शोध सुरु केला,कला क्षेत्राची आवड़ तसेच त्यांना कलाकारांविषयी आपुलकी तसेच वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात देखील त्यांचे कार्य सुरु असते.
शोध कार्य सुरू असतांना दोन दिवसांनी ती वयोवृध्द महिला विघ्नेश्वर चौकात आढळली,तिला त्यांनी मित्राच्या मदतीने स्वतःच्या गाडीत बसवून शांताबाईचे भाचे धोंडीराम लोढ़े यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून नवीन साड़ी परिधान करण्यास दिली त्यानंतर चहा नाश्ता देवून त्यांच्या सोबत संपूर्ण चर्चा केली असता, शांताबाईला तीन भाऊ होते ते आज हयात नसून स्वत लग्न न केल्यामुळे मूल नाहीत,शिक्षण न झाल्यामुळे लिहिता,वाचता येत नांही याचाच ग़ैरफ़ायदा घेवून त्यांच्या नावाचा तमाशाचा फड़ उभा करुन व यांची फ़सवून करुन तो दुसऱ्याला विकला. जवळच्या माणसाने देखील दगा दिल्यामुळे त्यांच्या मनावर खुप मोठा आघात झाला आहे.हे सर्व सांगत असतांना त्यांना अश्रु अनावर होत होते हुदंका देत ते सर्व सांगत होत्या राहण्यास स्वतःच घर नाही,शासनाचे टुटपुंजे मानधन ते पण तीन – चार महिन्यातून एकदा जमा होते,शरीर जीर्ण झाले आहे वय सत्तर वर्ष आहे सगळे सांगून झाल्यावर थोडासा नाश्ता झाल्यानंतर त्यांनी तमाशातील काही लावणी,गवळणी म्हणून दाखवल्या त्यांचा पहाड़ी आवाज व लक़ब,चेहरा व डोळ्यांतील हावभाव बघून मी भारावून गेलो,

त्यांचा वैदयकीय उपचार शिर्डी येथे करण्यात आला हि सर्व माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटिल याच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेबांपर्यंत पोहचवण्यात आली व साहेबांनी तिचे पालकत्व व एक लाख रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करुण देवू अस आश्वासन दिले आहे. तरी देखील त्यांना राहण्यासाठी घर बांधण्यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सर्व नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने पुढे यावे व मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.मदतीसाठी खालील बैंक अकॉउंट नं देत आहोत State Bank of india kopargaon Branch Name : shantabai Arjun londhe CIF no 86534561448 Acco no 32692611913