Homeकोपरगावकुंभारीत राघवेश्वर ग्रामीण पतसंस्था व कुंभारी नं.२ सोसायटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता...

कुंभारीत राघवेश्वर ग्रामीण पतसंस्था व कुंभारी नं.२ सोसायटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व कुंभारी नं.२सोसायटीच्या संयुक्तरित्या दि.२५ जून २०२३ रोजी सन २०२२ /२३ मध्ये शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच NEET परीक्षेत भरघोस यश मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रथमतःमहात्मा बसवेश्वर व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे सर्वश्रेष्ठ श्रीधर आप्पा कदम,पैठणे सर व कृषी पर्यवेशक सचिनजी शिंदे यांचे हस्ते पुजन करण्यात आले.

इयत्ता दहावीचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे

९३.४०% प्रथम क्रमांक कु.प्रचिती नानासाहेब कदम

९२.२०% द्वितीय क्रमांक चि.चैतन्य राजेंद्र बढे

९१.८०% तृतीय क्रमांक चि.सुदर्शन श्रीराम घुले,

९१.८०% तृतीय क्रमांक कु.मयुरी देविदास मोरे

त्याचप्रमाणे इयत्ता बारावीत

८१% प्रथम क्रमांक कु.निशा जितेंद्र महाजन,

७०.१७% द्वितीय क्रमांक चि.तेजस सुनिल कदम,

६२% तृतीय क्रमांक चि.गणेश नारायण ठाणगे

तसेच नाशिक येथे NEET परिक्षेत

५५५ मार्क मिळविलेले हर्षल वाल्मिक निळकंठ

औरंगाबाद येथे ४३५ स्कोर प्राप्त केलेली कु.श्रध्दा सुर्यभान पवार

छोटेखानी इ१लीमध्ये ९४ % गुण प्राप्त केलेले तन्मय योगेश चिने

या सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले व समस्त ग्रामस्थांच्या वतीने भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याचबरोबर शासकीय सेवेशी एकनिष्ठ राहून कुंभारी गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडुन भरघोस नुकसान भरपाई मिळवून देण्यात उल्लेखनीय कार्य करणारे श्री.सचिन शिंदे साहेब यांना कृषी पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तर ब्राम्हणगाव हायस्कूलमध्ये मुख्यध्यापक पदी अशोकराव वारूळे सर यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

आणि शिवसेना (ठाकरे गट) कोपरगाव उपतालुका प्रमुखपदी राजमहंमद गफुरभाई शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला

.त्याचबरोबर कुंभारी सोसायटी नंबर १च्या चेअरमन पदी अरूण उर्फ संजय पुंडलिक कदम

तर व्हा.चेअरमनपदी सोपानराव कारभारी ठाणगे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल हे सर्व सत्कार कुंभारी नं.२ सोसायटीच्या सभागृहात राघवेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्था व कुंभारी नं.२ सोसायटीच्या वतीने करण्यात आले.


सत्कार मुर्ती श्री.शिंदे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले कि,हा माझा एकट्याचा गौरव नसुन,माझ्या सर्व स्टाफचा व शेतकऱ्यांचा गौरव आहे, त्याचबरोबर त्यांनी विविध शासकीय योजनांची माहितीही शेतकऱ्यांना दिली.यांसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्तविकात ब्राम्हणगाव शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव वारूळे सर यांनी सांगितले कि,स्वदेशी पुज्य ते राजा | विद्वान सर्वत्र पुज्य ते या संस्कृत उक्तीप्रमाणे म्हणजे,एखाद्या राजाची त्याच्या राज्यात पुजा केली जाते परंतु विद्वानांची मात्र सर्वत्र पुजा व प्रसंशा होत असते आणि असे विद्वान,हिरे आपल्या गावात असून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली पाहीजे कारण कुंभारी सारख्या खेडेगावात शहराप्रमाणे कुठलीही सुविधा नाही येण्या- जाण्याची व्यवस्था नाही अशा अवस्थेत एवढे मार्क मिळविणे म्हणजे कौतुकाची बाब आहे,आपल्या गावात हायस्कूल असल्याने विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये बदल घडत आहे त्याचबरोबर विद्यार्थांना प्रोत्साहन देण्याचे काम पालकांनीही करावे आपल्या गावात जणु काही रत्नांची खाणच आहे यावरून ते सिद्ध होते असेही ते म्हणाले आणि म्हणुनच त्यांचा सत्कार करणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून या नंतरचे विद्यार्थी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त मार्क मिळवून एक उच्चशिक्षित आदर्श गाव बनेल यात शंका नाही अशीही ग्वाही दिली तर शेवटी उपस्थितांचे आभार पससंस्थेचे चेअरमन गोपीनाथ निळकंठ यांनी मानले.

यावेळी पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील विविध संस्थांचे आजी -माजी पदाधिकारी, संचालक,सदस्य,शिक्षक,शिवसैनिक, शिक्षणप्रेमी,शेतकरी,कर्मचारी वर्ग, महिला,विद्यार्थी -विद्यार्थीनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!