Homeकोपरगावकोपरगाव येथे गौतम सहकारी बँकेच्या माजी. संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते...

कोपरगाव येथे गौतम सहकारी बँकेच्या माजी. संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना काढून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
आज कोपरगाव येथे आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांना काढून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे गौतम सहकारी बँकेच्या माजी. संचालिका मा.सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कोपरगाव मतदारसंघातील वंचित दिव्यांगांना स्व-निधीतून नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचे त्या ठिकाणी असलेले शासकीय प्रमाणपत्र काढून त्यांना पुन्हा स्वगृही पोहचविण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून आमदार मा.श्री. आशुतोषदादा’ काळे करत आले आहे. त्यांनी दिव्यंगांना केलेल्या सहकार्यातून दिव्यंगांना एक नवी दिशा व प्रेरणा मिळत आहे. त्याबद्दल दिव्यांगानी आमदार मा.श्री आशुतोषदादा काळे यांचे मानले आभार.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,सौ. प्रतिभाताई शिलेदार,फकिरमामु कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,संदीप कपिले,राजेंद्र जोशी, इम्तियाजभाई अत्तार,राजेंद्र आभाळे,भाऊसाहेब भाबड,एकनाथ गंगूले,हर्षल जैस्वाल,विजय नागरे, यादवराव त्रिभुवन,रोहित चव्हाण, योगेश गंगवाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!