
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतचे नुतन सरपंच मा.दिपकराव रामदास चौधरी व डॉ.विजयराव संपतराव गोडगे यांचे सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथील भाचे मा.ऋषिकेश दत्तात्रय नरोडे यांची नुकतीच PSI पदी नियुक्तीझाल्याबद्दल कुंभारी येथील ऋषिकेश मेडिकल येथे त्यांचा कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.अहमदनगर सह नाशिक जिल्हयातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सत्कारमुर्ती मा.ऋषिकेश नरोडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले कि, आमचे आजोबा रामदास पिराजी चौधरी यांच्या कुटुंबात माझा जन्म झाला व माझे नाव ऋषिकेश ठेवण्यात आले.त्याचवेळी आमचे मामा डॉ. विजयराव गोडगे व दिपकराव चौधरी यांनी माझ्या नावाने कुंभारी येथे ऋषिकेश मेडिकल्स स्टोअर्स सुरू केले.आजपर्यंत ऋषिकेश नावावर आपण सर्व ग्रामस्थांनी जे प्रेम केले ते सदैव असेच असु द्यावे आणि माझा या ठिकाणी जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी राहिल.

यावेळी सामाजिक,धार्मिक,राजकीय अशा विविध क्षेत्रातील आजी -माजी पदाधिकारी व कुंभारी नं.१ सोसायटी आणि कुंभारी नं.२ सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे आजी -माजी सरपंच,सदस्य व त्यांचे कर्मचारी तसेच पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.तर शेवटी उपस्थितांचे डॉ. विजयराव गोडगे यांनी आभार मानले.