
मुर्शतपुर फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष,संचालक अप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होत गांवच्या उन्नतीत मोलाचा वाटा दिला असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष,संचालक अप्पासाहेब दवंगे यांनी केले.
तालुक्यातील मुर्शतपुर फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींना मोफत वहयांचे वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.प्रारंभी मुख्याध्यापक बाबासाहेब महानुर यांनी प्रास्तविक केले.अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत चार्टर्ड अकौंटंट परिक्षेत मुर्शतपुर गांवचा झेंडा झळकविल्याबददल शाम भगवान काकडे व अमिर बंडूभाई शेख या दोन विद्यार्थ्यांचा गांवच्यावतीने सत्कार करण्यांत आला.
श्री.आप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांच्या जीवनांत हिंगणी बंधारा बांधून मोठे आर्थीक परिवर्तन घडविले आहे.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शहरासह मतदार संघाच्या प्रत्येक संकटात खंबीर साथ दिली तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासू युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांनी नवनविन प्रयोगातुन सहकारी साखर कारखानदारीला सक्षम करण्याचा विडा उचलला असुन सभासद शेतक-यांच्या सहकार्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
याप्रसंगी सर्वश्री.साहेबराव शिंदे,अन्वरभाई शेख,रामदास शिंदे,प्रकाश दवंगे,मधुकर उगले,दिलीप शिंदे, सखाभाउ कुंदे,संदिप गुरूळे,सुधाकर शिंदे, बंडूभाई शेख,सिताराम तिपायले, त्रंबकराव दवंगे,जालिंदर शिंदे,अरिफ शेख,कैलास शिंदे,दादासाहेब उगले, रमेश नागरे,गणेश मोरे,शिवाजी काकडे,बाळासाहेब आवारे,विजय उगले,दत्तात्रय चौधरी,जोंधळे सर, सुपेकर सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संजीवनी उद्योग समुहातील संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आजी माजी संचालक मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी रामदास शिंदे यांनी आभार मानले.