
संपादक-राजेंद्र तासकर
एसडी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूल शहा येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२वा जन्मदिवस शिवजन्मोत्सव फॅन्सी ड्रेस काँम्पीटीशन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी जाधव सरपंच सौ.शुभांगी जाधव,तसेच पंचक्रोषीतील शेतकरी, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सर्व पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक निळकंठ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना जाधव सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे पराक्रम,शौर्य, जिद्ध, मेहनत, ध्येय याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे,त्याप्रमाणे प्रत्येकाने शिवचरित्र आपल्या आचरणात आणावे असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
मुख्यापक निळकंठ सरांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग सांगितले व त्यांचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी शाळेतील 144 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
फॅन्सी ड्रेस स्पर्धचे परीक्षण शिक्षक खेडकर व शिक्षिका नरोडे ताई यांनी केले तसेच सुत्रसंचलन कु.श्रावणी घुमरे व सृष्टी शेळके यांनी केले तर खेडकर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा शेवट शिवरायांच्या महाआरतीने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.