Homeकोपरगावआपल्या कलेने आयुष्यभर जनसामान्यांना हसत ठेवणाऱ्यांवर आज रडण्याची वेळ ;अखेर जगताहेत हालाखीचे...

आपल्या कलेने आयुष्यभर जनसामान्यांना हसत ठेवणाऱ्यांवर आज रडण्याची वेळ ;अखेर जगताहेत हालाखीचे जीवन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवसाची शाळा करून स्वरचित गीत,पोवाडे याच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर रशियात छ्त्रपती शिवाजी महारांजांवर आधारित पोवाड्याच्या माध्यमातून डंका वाजवीला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर देवून स्वतःला तोडक – मोडक वाचता येईल इतकच शिकण घेऊन आपल्या अंगी असणारी कला सादर करून आयुष्यभर जनसामान्याना हसत ठेवणाऱ्या तालुक्यातील मुर्शतपूर येथील मातंग समाजाचे कलावंत मुसलीधर ओंकार पाटोळे हे आज जगताहेत हालाखीचे जीवन.

त्यांनी वयाचे ३०ते ३५ वर्षे जिभाऊ पाटील खांन्देश,भिका -भिमा सांगवीकर,आनंद महाजन जळगावकर,संगिता महाडीक पूणेकर यांसह आदि तमाशा मंडळात काम केले,अखेर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या तमाशा मंडळात अनेक वर्षे पार्टी काम (व्हीलन)चे काम करून लोकगीत, भावगीत,भक्तीगीत,गण,गवळणी, सिनेमातील गाणी,लावण्या,वगनाट्य सादर करून रसिकांची मनं जिंकली.आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनामध्ये घर करू शकले परंतु,उतरत्या वयात आपल्याला स्वतःचे घर लागेल याची चिंता त्यांना नेहमी सतायची परंतु काय करणार घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ते स्वतःचा निवारा करू शकले नाही आणि आज अखेर त्या काळच्या कलावंतांना इतभर पोटासाठी,पाहा केव्हढी आटा आटी,पोट मोठे अनिवार हिंडवीते दारोदार या संतांच्या उक्तीप्रमाणे कधी दोन वेळच्या अन्नासाठी दारोदार हिंडावे लागत आहे,तर कधी राहण्यासाठी निवारा मागत हिंडावे लागत आहे. एका कलावंतावर हि वेळ येणे म्हणजे एक शोकांतिकाच मानावी लागेल.त्यांना शहराच्या ठिकाणी जाऊन भटकंती करून मिळल त्यावर आपल्या मोडक्या -तोडक्या झोपड्यात येऊन गुजरणा करावी लागत आहे.इतके हालाखीचे जीवन जगण्याची वेळ मुरलीधर ओंकार पाटोळे यांच्यावर आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पाटोळे यांनी तमाशा मंडळात वयाच्या ६० वर्षापर्यंत शांताबाई लोंढे कोपरगावकर,दामू आण्णा चाळीसगावकर,देवराम म्हस्के पढेगावकर, कारभारी डोखे करंजीकर, भास्कर नेटारे तळेगावकर,एकनाथ पगारे डोंगरगावकर,दगडु गायकवाड जेऊर पाटोदकर या सहकाऱ्यांसोबत ३०ते ३५वर्षे पार्टी काम (व्हीलन) चे काम करून आपल्या अंगी असलेली कला सादर करण्यात घालवली.परंतु, अंगी कला असुन सुद्धा सादर करण्याची अंगातील रग (ताकद) कमी झाल्याने नाईलाजाने गावी यावे लागले,गावी येऊनही तब्बल १३ते १४ वर्षे लोटली गेली,ग्रामपंचायतच्या तीन पंचवार्षिक चा कार्यकाळ पूर्ण झाला. परंतु,मुरलीधर पाटोळे यांचा संबंधीत ग्रामपंचायमध्ये साधा घरकुलासाठी सुद्धा विचार केला गेला नसल्याने ते हतबल झाले आहे.आज त्यांची कामधंदा करण्याची शारीरिक परिस्थिती नसतांना सुद्धा ते पोटासाठी शहरात वनवन भटकंती करून मिळेल ते काम करून मोडक्या – तोडक्या झोपड्यात पत्नीसह गुजरणा करत आहे.याकडे शासनाने लक्ष द्यावे व कलावंत मुरलीधर पाटोळे यांना शासकीय सोयीसुविधेचा व ग्रामपंचायत मार्फत घरकुलाचा लाभ मिळावा हिच माफक अपेक्षा.

पुढे ते म्हणाले कि,मी आज शरीराने वयोवृद्ध झालो आहे,माझ्या अंगी असणारी कला नाही त्यावेळी त्यांनी तमाशातील काही डायलॉग,गीत, गवळणी गावून उपस्थितांना भारावून टाकले.बराच वेळ चर्चेनंतर ते म्हणाले, माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मला व माझ्या पत्नीला निवाऱ्याची गरज आहे ती पूर्ण करावी अशी विनंती मुरलीधर पाटोळे यांनी शेवटी शासनाकडे या माध्यमातुन केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!