Homeकोपरगावराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात हरभरा व...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात हरभरा व गहु बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अहमदनगर यांनी चालु रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम जाहिर केला असुन त्यानुसार सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगांव येथे कृभको कंपनीचे १४० क्विंटल व महाबीजचे ७० क्विंटल हरबरा बियाणे शासन अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध असुन शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.

ते म्हणाले की,या बियाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रती किलो २५ रूपये अनुदान जाहिर केले आहे. शेतक-यांना अनुदान रक्कम वजा जाता ३० किलो हरबरा बियाणे १८०० रूपयांस उपलब्ध करून देण्यांत आले आहे तर रब्बी हंगामासाठी २१७ क्विंटल गव्हाचे बियाणे आले असुन ४० किलोची महाबीज गहु प्रती बॅग अनुदान वजा जाता ११२० रूपयास विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यांत आली आहे,तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, विविध शासकीय कृषी बियाणे योजनांचा लाभ शेतक-यांना व्हावा यासाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ सदैव सहकार्य करत आहे,त्याचप्रमाणे चालु दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने शेतक-यांना पशुधन जगविण्यासाठी मोफत चारा बियाणे उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन एका लाभार्थी शेतक-यास एकरी १५ किलो चारा बियाणे मोफत दिले जाणार आहे तरी याबाबत शेतक-यांनी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधुन याही योजनेचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!