Homeकोपरगावसाईमंदिरच्या CCTV फुटेज गुन्ह्यात साईबाबा संस्थांनचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांच्या...

साईमंदिरच्या CCTV फुटेज गुन्ह्यात साईबाबा संस्थांनचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांच्या अडचणीत वाढ

संपादक – राजेंद्र तासकर
साईमंदिरच्या CCTV फुटेज गुन्ह्यात साईबाबा संस्थांनचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सीसीटीव्ही फुटेज प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने संजय काळे यांचा जवाब नोंदवण्याचे आदेश दिले होते.जवाब नोदंवल्यावर पुढील तपास लवकर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे पुढील तपास लवकर होऊन बगाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दि.०९.१०.२०२१ रोजी मा.साईबाबा संस्थानचा कारभार सांभाळण्यासाठी तदर्थ
समिती स्थापन केली होती. साईबाबा संस्थान ट्रस्टचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर हे तदर्थसमितीचे अध्यक्ष होते, साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सचिव होते,तर अतिरिक्त
चे विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर हे समितीचे सदस्य होते.तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय मा.उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत होते.सदर समिती ऑक्टोबर,२०१९ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत साईबाबा संस्थान चा कारभार सांभाळत होती.कान्हूराज बगाटे,तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान,शिर्डी हे तदर्थ समितीला सुरळीत काम करण्यास आडकाठी आणतात असेअहवाल वेळोवेळीमा.अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी मा.उच्च न्यायालयात सादर केलेले होते.तसेच बगाटे यांनी बेकायदेशीर पद्धतीने शासनाची दिशाभूल करून तिरुपती दौरा केला होता.तसेच त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान,शिर्डी पदी नियुक्ती नियमाला धरून नसल्यामुळे सनदी IAS अधिकारी नेमावा.अशा विविध विषयवार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय काळे यांनी तक्रारी राज्य शासनाकडे केल्या होत्या.सदर तक्रारींवर आजवर चौकशी देखील चालू आहे.तसेच तत्कालीन तदर्थ समितीच्या अध्यक्ष विरुद्ध तक्रारकरण्यासाठी भडकावणे,वॉट्सअप वर मेसेज
करून हॉस्पिटल मधील विषय संदर्भात माहिती मागवणे व तक्रार करण्यासाठी दबाव टाकणे, तसेच काळे यांच्या बद्दल बदनामीकारक संदेश सामाजिक माध्यमावर टाकणे,धमकावणे, तसेच कर्मचाऱ्यांना खोटे गुन्हे
दाखल करण्याचे सांगणे इ.बाबी श्री.बगाटे यांनी सुरु केल्या होत्या.त्यामुळे श्री.काळे यांनी सदर बाबीची देखील तक्रार पोलीस यंत्रणेला दिली होती.
दि.३१.०५.२०२१रोजी,मा. तत्कालीन अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश,अहमदनगर व सदस्य तथा सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर यांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्यांचे मंदिर परिसरातील फोटो व
CCTV फोटेज विनापरवानगी श्री.बगाटे व त्यांचे कर्मचारी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला देऊन कोरोना काळात त्यांच्यावर दर्शन घेतल्याचा उहापोह करून कारवाई करण्याची मागणी केली होती.तसेच सामाजिक माध्यमावर सदर प्रकरणाचा आधार घेत संजय काळे यांची बदनामी करणारा संदेश तत्कालीन संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे व नवनाथ दिघे यांनी प्रसारित करण्याचा पुढाकार घेतला होता.त्याअनुषंगाने नवनाथ दिघे यांच्या वर कलम ५००अंतर्गत गुन्हानोंद करण्यात आला.परंतु बगाटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागेल असे पत्र कोपरगाव शहर पोलीस ठाणे मार्फत दिले होते.संजय काळे यांनी ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून कान्हुराज बगाटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागेल असे पत्र नियमबाह्य असल्याचा दावा करत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.अशी विनंती सदरयाचिकेत केली होती.तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश,अहमदनगर व सदस्य तथा सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्यांचे मंदिर परिसरातील फोटो व CCTV फोटेज विनापरवानगी प्रसारित करून बगाटे व त्यांचे कर्मचारी यांनीअध्यक्ष व सदस्य यांचा हेतू काय होता व त्या अनुषंगाने योग्य तपास होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती देखील सदर याचिकेत केली होती.सदर प्रकरणात याचिका प्रलंबित असताना CCTV फुटेज विनापरवानगी प्रसारित केल्या प्रकरणी ५संस्थान कर्मचाऱ्यां विरुदध शिर्डी पोलीस ठाणे येथे गु.र न.३१०/२०२१ दाखल झाला व सदर गुन्ह्यात दोषआरोप पत्र पण दाखल झाले.याचिकाकर्ते संजय काळे यांचा जवाब न घेता व बगाटे या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असतांना देखील त्यांना आरोपी न करता घाईघाईने दोष आरोप पत्र दाखल केल्याने काळे यांनी त्यांचा जवाब नोंदवायची विनंती केली असता,मा.उच्च न्यायालयाने तपास अधिकारी, शिर्डी पोलीस ठाणे यांना काळे यांचा जवाब नोंदवण्याचे आदेश दिले होते.
काळे यांनी त्यांच्या जबाबात CCTV फुटेज गुन्ह्यातील कटाचा मुख्य सूत्रधार कान्हुराज बगाटे असून त्याला जाणीवपूर्वक तपास यंत्रणाने आरोपी न करता सदर प्रकरणाला ढील दिली आहे.
संजय काळे यांचा जवाब नोंदवल्यानंतर आज दि.०३.०३. २०२२ रोजी मा.उच्चन्यायालयांचे मा.न्या.व्ही.के.जाधव व मा.न्या.एस.सी.मोरे यांनी याचिकाकर्ते संजय काळे यांचा जवाबानुसार पुढील चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यकता भासल्यास पुरवणी दोष आरोप पत्र दाखल करण्याचे आदेश दिले.तसेच सदर तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे देखील आदेश दिले.
सदर प्रकरणात याचिका कर्त्यांच्या वतीने ऍड प्रज्ञा तळेकर,अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ऍड डी आर काळे,यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!