
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथील शेतकरी सोमनाथ बाबुराव गडाख हे आपल्या स्वतःच्या शेतातमध्ये वस्ती (घर )बांधुन गेल्या अनेक वर्षापासून राहतात,घरालगतच त्यांनी पत्रा शेड साधारण तीस फुटाची कांदा चाळ बांधलेली आहे त्यास जाळी कंपाऊड लावलेले असून लगतच नारळाचे ७ ते ८ झाडांसह अन्य झाडे लावलेली आहे. मात्र ;२६ नोव्हेंबरच्या रात्री साधारण ९:३०ते १० वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या पावसाबरोबर जोराचा विजेचा कडकडाट होऊन कांदा चाळीला खेटून असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि संपूर्ण शेडसह घराचे पत्रे लालबुंद होऊन आजूबाजूस जाळाचे लोळ फेकले गेले मात्र ;नशीब

बलवत्तर होते म्हणून तेथे झोपलेल्या व्यक्तींसह जनावरांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही मात्र घरातील साधारण ८०ते ९० हजाराच्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तु जळुन खाक झाल्या आहे.
सदर घटनास्थळाची पहाणी कुंभारीचे कामगार तलाठी गर्कल सोा यांनी करुन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घटनेची माहीती दिली.